अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली इंटरनेट डेटासह BSNL घेऊन आलाय नवा रिचार्ज प्लॅन, 1 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतकी व्हॅलिडीटी
स्वस्त्यात मस्त रिचार्ज प्लॅनचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर केवळ BSNL चं नाव येतं. कारण सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्या युजर्सना स्वस्त आणि उत्तम फायदे असलेला रिचार्ज प्लॅन ऑफर करते. त्यामुळे कमी खर्चात अधिक फायदे देण्यासाठी BSNL प्रचंड लोकप्रिय आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी खाजगी कंपन्यांपेक्षा कमी किमतीत उत्तम व्हॅलिडीटी आणि डेटा प्लॅन ऑफर करते.
BSNL ने त्यांच्या युजर्ससाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर केले आहेत, ज्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली इंटरनेट डेटासह अनेक फायदे ऑफर केले जातात. BSNL च्या अशाच काही रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या रिचार्ज प्लॅनमध्ये 397 रुपयांचा प्लॅन, 897 रुपयांचा प्लॅन आणि 997 रुपयांचा प्लॅन यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही दीर्घ व्हॅलिडीटीसह कॉलिंग प्लॅन शोधत असाल तर BSNL चा 397 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. 397 रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्ण 150 दिवसांची म्हणजेच 5 महिन्यांची व्हॅलिडिटी दिली जाते. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना पहिल्या महिन्यासाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसचा लाभ घेता येईल. एक महिना पूर्ण झाल्यानंतर, हा प्लॅन तुमचे कनेक्शन सक्रिय ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
BSNL चा 897 रुपयांचा प्लॅन 6 महिने म्हणजेच 180 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. व्हॅलिडीटी कालावधी दरम्यान, ग्राहकांना दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. ग्राहक देशातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, वैधतेदरम्यान एकूण 90GB डेटा दिला जात आहे. ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, 40Kbps वेगाने डेटा एक्सेस करता येईल.
897 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत या प्लॅनची वैधता थोडी कमी आहे, परंतु डेटा मर्यादा वाढते. या प्लॅनची वैधता 160 दिवसांची आहे. वैधता कालावधी दरम्यान, ग्राहकांना देशभरात अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. मर्यादा गाठल्यानंतर, वेग 40Kbps पर्यंत कमी होईल.
BSNL ने आपल्या ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर जाण्यापासून रोखण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. हा प्लॅन 750 रुपयांचा आहे आणि त्याची व्हॅलिडीटी 6 महिने असेल. ही योजना फक्त अशा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ज्यांनी एका आठवड्यापासून त्यांचे अकाऊंट रिचार्ज केलेले नाही. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना 165 दिवसांचा कालावधी दिला जाईल.