Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grok AI ची वादग्रस्त उत्तर सोशल मीडियावर व्हायरल, X ला ठरवलं जबाबदार; Elon Musk च्या अडचणीत होणार वाढ? वाचा सविस्तर

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, ग्रोकवरील सर्व वादग्रस्त उत्तरांसाठी एलॉन मस्कचा 'एक्स' जबाबदार आहे. या प्रकरणात एक्स आणि ग्रोक यांच्याशी चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 26, 2025 | 12:54 PM
Grok AI ची वादग्रस्त उत्तर सोशल मीडियावर व्हायरल, X ला ठरवलं जबाबदार; Elon Musk च्या अडचणीत होणार वाढ? वाचा सविस्तर

Grok AI ची वादग्रस्त उत्तर सोशल मीडियावर व्हायरल, X ला ठरवलं जबाबदार; Elon Musk च्या अडचणीत होणार वाढ? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

Elon Musk च्या Grok AI चा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तर शोधण्यापासून ते अगदी एखादी ईमेज क्रिएट करण्यापर्यंत Grok AI तुम्हाला तुमच्या सर्व कामांत मदत करतो. Grok AI च्या फायद्यांसोबतच त्याच्या गैरवापरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. Grok AI चा गैरवापर सध्या प्रचंड वाढला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नियंत्रित आणि सकारात्मक असला पाहिजे, ही संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. परंतु काही कारणांमुळे हा वापर चुकीच्या पद्धतींमध्ये बदलत आहे.

आता केवळ 10 मिनिटांत तुमच्या घरी येणार iPhone ची डिलीव्हीरी, Zepto नंतर आता ‘या’ कंपनीने सुरु केली सर्व्हिस

हा गैरवापर आणि इतर देशांचे AI टाळण्याचा एकमेक मार्ग म्हणजे भारत सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे की, देश स्वतःचा चॅटबॉट तयार करेल आणि देशातील त्याच्या उत्तरांनाच अधिकृत मान्यता देईल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्यासोबत पॅरिसमध्ये झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि मानवी संसाधनांमध्येच नव्हे, तर राजकारणातही परिवर्तन घडवित आहे. त्यांचे हे विधान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सकारात्मक परिणामाबद्दल होते, परंतु सध्या त्याचा दुसरा आणि नकारात्मक पैलू वेगाने पुढे येत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

गेल्यावर्षी गुगलच्या एआय चॅटबॉट जेमिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर सरकारने याबद्दल त्वरित कारवाई केली. या सर्व प्रकरणानंतर जेमिनी प्रत्येक वेळी बरोबर असू शकत नाही, त्याला मर्यादा आहेत, याबाबत गुगलला चेतावणी देण्यात आली होती. सरकारने त्वरित एआय जनरेटेड कंटेंटबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. जेमीनीने केलेल्या या हलगर्जीपणानंतर आता मस्कचा AI देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सध्या ग्रोकची काही वादग्रस्त उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, ग्रोकवरील सर्व वादग्रस्त उत्तरांसाठी एलॉन मस्कचा ‘एक्स’ जबाबदार आहे आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. दुसरीकडे मंत्रालयाने स्पष्ट केले की, त्यांनी ग्रोकच्या उत्पादन कंपनी एक्सला कोणतीही नोटीस पाठविलेली नाही. मात्र या प्रकरणात एक्स आणि ग्रोक यांच्याशी चर्चा सुरू आहे.

सध्या ट्रम्प यांचे आवडते आणि ग्रोकचे मालक एलॉन मस्क यांची ताकद सर्वांनाच माहिती आहे, पण सत्य हे आहे की, ग्रोकच्या बाबतीत सरकारने एक्सबाबत इतकी कठोर भूमिका घेतली पाहिजे की, त्यामुळे अशा चॅटबॉट उत्पादकांना धडा शिकविता येईल. कारण वादग्रस्त उत्तर आणि चुकीची माहिती यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे भविष्यात अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर एकच प्रश्न वेगवेगळ्या स्त्रोतांकडून विचारला गेला तर उत्तरे बहुतेकदा सारखीच असतात; परंतु ती वेगवेगळ्या शैलीत आणि वेगवेगळ्या अर्थाने असतात. ग्रोकच्या उत्तरामुळे सरकार, भाजपा, त्यांचे नेते आणि समर्थक अस्वस्थ होत आहेत. जर चॅटबॉट्स लोकशाही सरकारांच्या उणीवा दाखवित असतील तर ते स्वागतार्ह आहे, परंतु ते निःपक्षपातीपणे करीत आहेत याची कोणतीही हमी नाही.

Lava Shark स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत 7 हजारांहून कमी; 50MP कॅमेरा आणि120Hz डिस्प्लेने सुसज्ज

चॅटबॉटच्या क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांच्या वर्चस्वाला चीन आणि इतर देशांतील कंपन्यांनी Grok अरबने त्यांचा चॅटबॉट रेयान मैदानात उतरविला आहे. गेल्या काही महिन्यांत चॅटबॉटवरून शर्यत तीव्र झाली आहे. सौदी अरबने त्यांचा चॅटबॉट रेयान मैदानात उतरविला आहे. रेयान हे फक्त एक बाजार विश्लेषक आहेत, परंतु येणाऱ्या चॅटबॉट्सबद्दल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते तयार करणारे लोक त्याच्या आवडीनिवडी यामध्ये प्रविष्ट करू शकतात. यामुळे त्यांचे विचार किंवा निर्णय एकतर्फी असू शकतात. जर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशाच प्रकारच्या अनियंत्रित श्रेणीत चॅटबॉट्स येऊ लागले, तर सरकारे नेहमीच अडचणीत राहतील. विविध भारतीय समाजात द्वेष आणि शत्रुत्व पसरविणे ही एक सामान्य बाब ठरेल.

Web Title: Grok ais controversial response goes viral x held responsible trouble for elon musk tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • AI technology
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स
1

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
2

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर
3

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…
4

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.