आता केवळ 10 मिनिटांत तुमच्या घरी येणार iPhone ची डिलीव्हीरी, Zepto नंतर आता 'या' कंपनीने सुरु केली सर्व्हिस
फास्ट डिलीवरी अॅप झेप्टोने अलीकडेच आयफोनची 10 मिनिट डिलीव्हरी सुरु केली आहे. त्यामुळे आता आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुकानात जाण्याची किंवा लांब रांगेत थांबण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ तुमचा स्मार्टफोन ओपन करायचा आहे आणि त्यानंतर झेप्टो ओपन करून आयफोन ऑर्डर करायचा आहे. ऑर्डर केल्यानंतर पुढील 10 मिनिटांत तुम्हाला तुमच्या आयफोनची डिलीव्हरी मिळणार आहे. झेप्टोने सुरु केलेल्या या सर्विसनंतर आता आणखी एका कंपनीने आयफोनची 10 मिनिटांत डिलीव्हरीची सर्विस सुरु केली आहे.
Lava Shark स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत 7 हजारांहून कमी; 50MP कॅमेरा आणि120Hz डिस्प्लेने सुसज्ज
फास्ट डिलीवरी सर्विसाठी प्रसिद्ध असणाऱ्या स्विगी इंस्टामार्टने आता इलेक्ट्रॉनिक्स सेगमेंटमध्ये त्यांचं पाऊल ठेवलं आहे. आता कंपनी केवळ इतर वस्तूंसोबतच आयफोनची डिलीव्हरी देखील 10 मिनिटांत करणार आहे. झेप्टोप्रमाणेच तुम्ही आता स्विगी इंस्टामार्टवरून देखील 10 मिनिटांत आयफोनची डिलीव्हरी मिळवू शकता. कंपनीने सुरु केलेली ही नवीन सर्विस सध्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पुणे, गुडगाव, नोएडा आणि फरीदाबाद यासह 10 प्रमुख भारतीय शहरांमध्ये उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील इतर शहरांमध्ये देखील लवकरच ही सेवा सुरु केली जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच सर्व भारतीयांना घरबसल्या त्यांच्या आयफोनची डिलीव्हरी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ग्राहक आता Apple, Samsung, OnePlus आणि Xiaomi सारख्या प्रमुख ब्रँडचे स्मार्टफोन ऑर्डर करू शकतात, ज्याची डिलीव्हरी त्यांना केवळ 10 मिनिटांत मिळणार आहे. या स्मार्टफोन्स मॉडेल्समध्ये प्रामुख्याने iPhone 16e, Samsung M35, OnePlus Nord CE आणि Redmi 14C यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर आता या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही Oppo, Vivo, Realme आणि Motorola चे डिव्हाईस देखील ऑर्डर करू शकता. ज्याची डिलीव्हरी देखील केवळ 10 मिनिटांत केली जाणार आहे.
कंपनीने सांगितलं आहे की, ही नवीन सेवा सुरु करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतीय ग्राहक चांगले माहितीदार आहेत आणि त्यांना नेमके काय हवे आहे हे माहित आहे. या नवीन उपक्रमामुळे लोकांना उच्च दर्जाच्या तांत्रिक डिव्हाईसची जलद डिलीव्हरी मिळेल. तुम्हाला एखादी गोष्ट लवकर हवी असेल किंवा तुम्ही बऱ्याच काळापासून काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही खरेदी आता स्विगी इंस्टामार्टच्या मदतीने अधिक सोपी झाली आहे.
स्विगी इन्स्टामार्ट आपली पोहोच वाढवण्यासाठी एकामागून एक सेवा सुरू करत आहे, आता ती 100 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे, 2025 मध्येच 32 नवीन ठिकाणे जोडली गेली आहेत. सुरुवातीला किराणा सामान आणि दैनंदिन गरजांवर लक्ष केंद्रित केलेल्या या प्लॅटफॉर्मचा इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रवेश त्याच्या जलद व्यापार ऑफरमध्ये एक धोरणात्मक बदल दर्शवितो.
याशिवाय, अलिकडेच तुम्ही लोकप्रिय क्विक कॉमर्स सेवा झेप्टो वरून 10 मिनिटांत अॅपल आयफोन किंवा इतर कोणतेही अॅपल उत्पादन ऑर्डर करू शकता. कंपनीच्या सह-संस्थापकांनी अलीकडेच लिंक्डइन पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली.