
ClickFix Scam: एक क्लिक अन् रिकामं होईल अकाऊंट... CAPTCHA व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सुरू आहे नवा खेळ, असं राहा सुरक्षित
Tech Tips: हिवाळ्यात फोन चार्ज करताना टाळा ‘या’ चुका… बॅटरीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या
या स्कॅममध्ये हॅकर्स सामान्य ब्राऊझिंग पद्धतीने तुमच्या कंप्युटरपर्यंत पोहोचतात. या नव्या स्कॅमबाबत अनेक तज्ज्ञ आणि मोठ्या ग्लोबल एजेंसींनी अलर्ट जारी केला आहे. यामध्ये एका छोट्या चुकीमुळे तुमचा पासवर्ड, ब्राऊझर डेटा आणि अकाऊंट्स धोक्यात येऊ शकते. हा स्कॅम नक्की काय आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)
सहसा वेबसाईटवर CAPTCHA व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी काही फोटोंची निवड करावी लागते किंवा काही अक्षरं टाईप करण्यासाठी सांगितलं जातं. मात्र ClickFix स्कॅम पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने घडतो. द गार्डियनने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, या स्कॅममध्ये जेव्हा एखादा यूजर एका बनावट कॅप्चा बॉक्सवर क्लिक करतो, तेव्हा वेबसाईट गुपचूप एक धोकादायक कोड कॉपी करते आणि तुमच्या कंप्यूटरच्या क्लिपबोर्डमध्ये सेव्ह करते. याबाबत तुम्हाला समजत देखील नाही.
यानंतर स्क्रीनवर अगदी खऱ्या वाटणाऱ्या सूचना दिसू लागतात. यामध्ये यूजरला असं सांगितलं जात की, व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी किबोर्डवर आधी Windows + R प्रेस करा, त्यानंतर Ctrl + V करून कोड पेस्ट करा आणि अखेरीस Enter दाबा. ही प्रोसेस पूर्ण करताच लपलेला मैलिशियस कोड सिस्टिममध्ये कार्यान्वित होतो. यानंतर बॅकग्राऊंडमध्ये वायरस किंवा मालवेयर इंस्टॉल करण्याची प्रोसेस सुरु केली जाते.
धोकादायक कमांड तुमच्या संगणकावर कार्यान्वित झाली की, ती थेट हॅकर्सच्या नियंत्रणाखालील सर्व्हरशी जोडली जाते. यानंतर सिस्टिममध्ये आणखी धोकादायक स्क्रिप्ट्स किंवा फाईल डाऊनलोड केल्या जाऊ शकतात. याचा थेट परिणाम सेव्ह केलेले पासवर्ड्स, ब्राउझर हिस्ट्री, लॉगिन डिटेल्स आणि इतर डेटावर होतो. याचा चुकीचा वापर केल्यास तुमचे अकाऊंट रिकामी होऊ शकते.
अशा पद्धतीच्या स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, कोणतीही वेबसाईट किंवा योग्य CAPTCHA सिस्टिम तुम्हाला कधीही Windows + R प्रेस करून कोणतीही कमांड पेस्ट करायला सांगत नाही. एखाद्या व्हेरिफिकेशन पेज, एरर मेसेज किंवा क्रॅश पॉप-अपमध्ये जर तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकटद्वारे काही प्रोसेस पूर्ण करायला सांगितलं जात असेल तर सावध व्हा. ही हॅकर्सची नवीन खेळी असू शकते. अशावेळी टॅब त्वरित बंद करा.
कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर क्लिक करण्यापूर्वी त्याचा यूआरएल काळजीपूर्वक तपासा. तुमच्या कंप्युटरची ऑपरेटिंग सिस्टिम, वेब ब्राउजर आणि अँटीवायरस सॉफ्टवेयर नेहमी अपडेट ठेवा. याशिवाय तुमच्या महत्त्वाच्या अकाऊंट्समध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा.
Ans: ClickFix Scam हा ऑनलाइन फसवणुकीचा एक नवीन प्रकार आहे. यामध्ये हॅकर्स बनावट CAPTCHA व्हेरिफिकेशन किंवा एरर मेसेजच्या माध्यमातून यूजर्सना धोकादायक कमांड रन करण्यास भाग पाडतात.
Ans: या स्कॅममध्ये बनावट CAPTCHA वर क्लिक केल्यानंतर हॅकर्स धोकादायक कोड कॉम्प्युटरच्या क्लिपबोर्डमध्ये कॉपी करतात. त्यानंतर यूजरला Windows + R, Ctrl + V आणि Enter दाबण्यास सांगितले जाते. असे केल्यास मालवेअर सिस्टिममध्ये कार्यान्वित होऊ शकते.
Ans: या स्कॅममुळे कॉम्प्युटरमधील सेव्ह केलेले पासवर्ड, ब्राउझर हिस्ट्री, लॉगिन डिटेल्स आणि महत्त्वाचा डेटा चोरीला जाण्याचा धोका असतो. तसेच हॅकर्स तुमच्या ऑनलाइन अकाउंट्सचा गैरवापर करू शकतात.