Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन
कारण बँकिंग ऐप, UPI पेमेंट, सोशल मीडिया लॉगिन किंवा ऑनलाइन शॉपिंग, प्रत्येक ठिकाणी ओटीपीचा वापर केला जातो. अनेक स्मार्टफोनमध्ये अशी सेटिंग असते की ओटीपी थेट तुमच्या लॉक स्क्रीनवर दिसतो. जर एखाद्या स्कॅमरने ही ओटीपीची नोटिफिकेशन बघितली तर? केवळ ओटीपीच नाही तर आपल्या स्मार्टफोनमध्ये अशा अनेक नोटिफिकेशन येतात जर त्या चुकीच्या हातात पडल्या तर तुमची सुरक्षा नक्कीच धोक्यात येईल. अशावेळी सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही स्मार्टफोन सेटिंगचा वापर करू शकता. स्मार्टफोनमध्ये अशी एक सेटिंग असते ज्यामुळे तुम्ही लॉक स्क्रीनवर दिसणाऱ्या नोटिफिकेशनची सेटिंग बदलून तुमची सुरक्षा वाढवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही अँड्राईड यूजर असाल तर काही सोप्या सेटिंग बदलून तुमची प्रायव्हसी अधिक मजबूत करू शकता. सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग ओपन करा आणि नोटिफिकेशन पर्याय निवडा. इथे तुम्हाला लॉक स्क्रीन नोटिफिकेशन संबंधित पर्याय दिसेल. यामधे तुम्ही “हाईड सेंसेटिव्ह कंटेट” संबंधित पर्याय निवडू शकता. तुम्ही स्मार्टफोनमध्ये ही सेटिंग चालू केल्यानंतर तुम्हाला लॉक स्क्रीनवर मेसेज कंटेंट दिसणार नाही. केवळ तुम्हाला लॉक स्क्रीनवर अँपचे नाव दिसेल. तुम्हाला महत्त्वाच्या नोटिफिकेशन वाचण्यासाठी फोन अनलॉक करावा लागणार आहे.
आयफोन यूजर्ससाठी देखील Apple ने प्रायव्हसी संबंधित काही फीचर्स देण्यात आले आहे. आयफोन यूजर्स सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशनवर टॅप करा आणि आता शो प्रिव्ह्यु पर्याय निवडा. आता इथे व्हेन अनलॉक आणि नेव्हर हा पर्याय निवडा. यानंतर, तुम्ही फेस आयडी, टच आयडी किंवा पासकोडने फोन अनलॉक करेपर्यंत ओटीपी किंवा कोणत्याही मेसेजमधील मजकूर स्क्रीनवर दिसणार नाही.
दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी
लॉक स्क्रीन नोटिफिकेशन लपवण्याचा फायदा केवळ ओटीपीपर्यंत मर्यादित नाही. यामुळे तुमचे पर्सनल मेसेज, बँक अलर्ट, ईमेल आणि अॅप नोटिफिकेशन सर्वकाही सुरक्षित राहतं आणि दुसऱ्यांच्या नजरेपासून दूर राहतं. यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतोच, शिवाय तुमचे वैयक्तिक संभाषण देखील सुरक्षित राहते.






