Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया
कंपनी त्यांच्या ग्राहकांना अशी एक सुविधा देखील ऑफर करते, ज्यामध्ये युजर प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये अगदी सहज स्विच करू शकतात. ही प्रोसेस अगदी सोपी आहे. तुम्हाला यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही प्रीपेडमधून पोस्टपेड सर्विसवर स्विच करू शकणार आहात. सर्वात आधी प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही सर्विसेमधील अंतर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रीपेड म्हणजे असे प्लॅन असतात ज्यामध्ये तुम्हाला सर्विसचा वापर करण्यासाठी आधीच पैसे भरावे लागतात. तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग डेटा आणि ओटीटी प्लॅन्सचे फायदे हवे असतील तर तुम्हाला प्रीपेड सर्विसमध्ये आधीच पैसे भरावे लागणार आहेत. मात्र पोस्टपेडमध्ये पूर्णपणे उलट आहे. पोस्टपेडमध्ये तुम्हाला आधी सर्विसचा वापर करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यानुसार पेमेंट करावे लागणार आहे.
खरंतर अनेक युजर्सना असे वाटते की पोस्टपेड प्लॅन अधिक फायद्याचे ठरतात. कारण पोस्टपेड प्लॅनमध्ये बेनिफिट्स ठरवलेले असले तरी देखील तुम्ही यामध्ये जास्त फायदे वापरू शकता. तुम्ही जेवढे फायदे वापरणार आहात तुम्हाला त्यानुसार बिल भरावे लागेल. पोस्टपेड वापरण्यामध्ये कोणतीही कटकट नसते. महिन्याअखेरीस तुम्हाला एक बिल पाठवले जाते हे बिल भरल्यावर तुमचे पेमेंट पूर्ण होते. पोस्टपेड सर्विसमध्ये तुम्ही कोणत्या प्लॅनची निवड करता, त्याची व्हॅलिडीटी किती दिवस असणार आहे, या सर्वांचा विचार करण्याची गरज नसते. याशिवाय एअरटेल त्यांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनेक ओटीटी बेनिफिट्स देखील ऑफर करतो. यासोबतच यामध्ये फॅमिली मेंबर्सना देखील जोडले जाऊ शकते. त्यामुळे असे अनेक युजर्स आहेत जे पैशांचा विचार न करता पोस्टपेड मोबाईल सर्विसचा वापर करतात ज्यामुळे त्यांना अनेक फायदे वापरण्याची संधी मिळते.
तुम्ही देखील जर आता प्रीपेड वरून पोस्टपेडवर स्विच करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत. यासाठी तुम्हाला थेट तुमच्या जवळील एअरटेल स्टोअर्स किंवा ऑफिसमध्ये जावे लागेल. तसेच तुम्ही मोबाईल ॲप म्हणजेच एअरटेल थँक्स किंवा एअरटेलच्या वेबसाईट वरून देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. वेबसाईट ओपन केल्यानंतर पोस्टपेड सेगमेंटमध्ये जा. इथे तुम्हाला स्विच प्रीपेड टू पोस्टपेड ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स भरा आणि अपग्रेड टू पोस्टपेड व टॅप करा.
तुम्हाला टेलिकॉम कंपनीला KYC (Know Your Customer) डॉक्यूमेंट सबमिट करावे लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पोस्टपेड प्लॅनची निवड करावी लागणार आहे. तुमचा फोन नंबर तोच राहील, परंतु तुमची सेवा प्रीपेडवरून पोस्टपेडवर स्विच केली जाईल. या स्विचसाठी कोणतेही शुल्क नाही. प्रीपेडवरून पोस्टपेडवर स्विच करण्यासाठी साधारणपणे 24-48 तास लागतात. त्याहूनही चांगले, या स्विच दरम्यान कोणताही डाउनटाइम नाही.
Ans: Prepaid मध्ये आधी रिचार्ज करून सेवा वापरता येते, तर Postpaid मध्ये महिन्याच्या शेवटी बिल भरावे लागते.
Ans: होय. Airtel Store, MyAirtel App किंवा कस्टमर केअरच्या मदतीने स्विच करता येते.
Ans: वैध फोटो ओळखपत्र (आधार/पॅन) आणि पत्ता पुरावा आवश्यक असतो.






