Poco इंडिया हेड हिमांशु टंडनने कंपनीला केलं अलविदा! Nothing मध्ये सहभागी होण्याची वर्तवली जाते शक्यता, असा होता आतापर्यंतचा प्रवास
Poco इंडियाचे टॉप एग्जीक्यूटिव हिमांशु टंडन यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. हिमांशु टंडन यांनी Xiaomi च्या सब-ब्रँड Poco इंडियाला अलविदा म्हटलं आहे. असं म्हटलं जात आहे की, हिमांशु आता OnePlus चे को-फाउंडर Carl Pei ची कंपनी Nothing मध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
2022 मध्ये जेव्हा कंपनीने संघटनात्मक बदल केले तेव्हा टंडन यांनी POCO इंडियाचा कार्यभार स्वीकारला आणि तेव्हापासून त्यांनी ब्रँडच्या वाढीचे नेतृत्व केले. सध्या POCO ची मूळ कंपनी Xiaomi ला Vivo, Samsung आणि Oppo सारख्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. अशातच आता हिमांशु टंडन यांनी राजीनामा दिल्याच समोर आलं आहे. (फोटो सौजन्य – X)
समोर आलेल्या अहवालानुसार, अननेम्ड सोर्सेजद्वारे असं सांगितलं जात आहे की, हिमांशु टंडनने POCO इंडियाच्या टॉप एग्जीक्यूटिव पदाचा राजीनामा दिला आहे. असं मानलं जात आहे की, हिमांशु Nothing चा सब-ब्रँड CMF द्वारे जोडले जाऊ शकतात, हे एक यूके-बेस्ड टेक्नोलॉजी स्टार्टअप आहे. काही महिन्यांपूर्वी Xiaomi चे प्रेसिडेंट मुरलीकृष्णन बी यांनी देखील राजीनामा दिला होता. त्यानंतर आता हिमांशुने देखील राजीनामा दिला आहे. सध्या POCO इंडिया आणि Nothing या दोन्ही कंपन्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
POCO ची पेरेंट कंपनी Xiaomi ला भारतात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मार्केट रिसर्च फर्म कॅनालिसच्या 2025 च्या दुसऱ्या तिमाहीतील स्मार्टफोन शिपमेंट अहवालानुसार, शाओमीची वार्षिक वाढ 25 टक्क्यांनी घटली आहे. याच काळात, विवो आणि ओप्पो सारख्या प्रतिस्पर्धी चिनी कंपन्यांनी अनुक्रमे 31 टक्के आणि 24 टक्के वार्षिक वाढ गाठली आहे.
Canalys नुसार, भारतात Q2 2025 मध्ये Xiaomi ने सुमारे 5 मिलियन स्मार्टफोन्स शिप केले होते आणि याचे मार्केट शेअर 13 टक्के आहे. त्याच वेळी, Vivo ने 8.1 दशलक्ष युनिट्सच्या शिपमेंटसह आणि 21 टक्के शेअरसह बाजारपेठेत आघाडी घेतली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की Vivo आणि Xiaomi च्या या शिपमेंटमध्ये त्यांचे उप-ब्रँड iQOO आणि POCO देखील समाविष्ट आहेत.
Counterpoint Research चे डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितलं आहे की, ‘आम्हाला येथे चांगला समन्वय दिसतो. हिमांशूने POCO इंडियासाठी उत्तम काम केले आहे, त्यांनी ब्रँडचे नेतृत्व केले आहे. जर ते Nothing मध्ये सामील होत असतील तर तो Nothing साठी एक मोठा फायदा असेल. हा बदल अशा महत्त्वाच्या वेळी येत आहे जेव्हा Nothing ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विभागांमध्ये वेगाने प्रगती करत आहे. दोन्ही ब्रँडच्या यूजर बेसमध्ये बरेच साम्य आहे आणि हिमांशू ही वाढ आणखी कशी वाढवतात, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
CyberMedia Research (CMR) मध्ये इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (IRG) चे VP प्रभु राम यांनी म्हटलं आहे की, हिमांशू टंडन यांचा POCO च्या प्रमुखपदाचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी ठरला आहे, ज्यामुळे ब्रँडला जनरेशन Z मध्ये एक मजबूत ओळख मिळाली आहे आणि रिटेल चॅनेलमध्ये त्याची पोहोच वाढली आहे. आता POCO ला तिची अलीकडील वाढ कायम ठेवण्यासाठी तिची रणनीती वेगाने बदलावी लागेल.