20 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तगडे AI फीचर्स! iQOO च्या ढासू Smartphone ची धमाकेदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री
टेक कंपनी iQOO ने त्यांचा नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन iQOO Z10R या नावाने लाँच करण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. हा स्मार्टफोन Z10 सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. जे लोकं नवीन आणि बजेट स्मार्टफोनच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ठरणार आहे. हा स्मार्टफोन जरी बजेट किंमतीत लाँच करण्यात आला असाल तरी देखील फीचर्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन बजेट स्मार्टफोनमध्ये क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या नव्या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो. एवढंच नाही तर या बजेट स्मार्टफोनमध्ये अनेक ढासू AI फीचर्स देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – X)
iQOO च्या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, iQOO Z10R चा बेस व्हेरिअंट 19,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिअंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 23,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची विक्री 29 जुलैुपासून अॅमेझॉनवरून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन iQOO ई-स्टोर, अॅमेझॉन आणि निवडक रिटेल स्टोअरवरून खरेदी केला जाऊ शकतो.
The bar for performance just got raised. 🔥
Launched at ₹17,499*, the all-new #iQOOZ10R is the Segment’s First 32MP 4K Selfie Camera Smartphone**, and India’s Slimmest Quad-Curved Display Smartphone*** — crafted for those who never settle.
🛒 Sale starts 29th July, 12PM. Only… pic.twitter.com/bOa6EIONEB
— iQOO India (@IqooInd) July 24, 2025
iQOO च्या या ऑल न्यू डिव्हाईसमध्ये 6.77-इंच क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मूथ स्क्रॉल एक्सपीरियंससाठी डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डे लाइटमध्ये चांगल्या विजिबिलिटीसाठी 1800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. यासोबतच या फोनमध्ये HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे.
फोनमध्ये पावर देण्यासाठी मीडियाटेक 7400 5G चिपसेट देण्यात आला आहे. ज्याच्यासोबत 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये बाईपास चार्जिंग देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे गेमिंगदरम्यान फोनची बॅटरी जास्त गरम होणार नाही.
फोटोग्राफी लवर्ससाठी या डिव्हाईसमध्ये OIS सह 50MP चा Sony IMX882 कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K अल्ट्रा-क्लियर व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याशिवाय iQOO च्या या नव्या डिव्हाईसमध्ये 2MP चा बोकेह कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी लवर्ससाठी iQOO Z10R मध्ये 32MP चा 4K सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.