
आता येणार खरी मजा! ही टेक कंपनी तोडणार सर्व रेकॉर्ड्स, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीसह लाँच करणार स्मार्टफोन
नवीन वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपनी Honor असा एक स्मार्टफोन लाँच करणार आहे जो 10080mAh बॅटरी कॅपॅसिटीने सुसज्ज असणार आहे. बॅटरीच्या बाबतीत आतापर्यंतचा हा सर्वात दमदार स्मार्टफोन मानला जात आहे. यावरून असे संकेत मिळत आहेत की पुढील वर्षी आपल्याला आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन वापरण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडाली आहे.
Honor Power यावर्षी चीनमध्ये लाँच करण्यात आला होता आणि कंपनी या फोनचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याची तयारी केली आहे. या आगामी स्मार्टफोनबाबत सतत नवीन अपडेट समोर येत आहे. आता नुकतीच या स्मार्टफोनची बॅटरी कशी असणार याबाबत एक लीक समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की आगामी स्मार्टफोनमध्ये 10,080mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन अशा ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे, ज्यांना मोठ्या बॅटरीची आवश्यकता असते. Honor Power मध्ये 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Honor Power 2 मध्ये 6.79 इंच LTPS फ्लॅट स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे, जी 1.5K रेजॉल्यूशनसह उपलब्ध असेल. हा आगामी स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 8500 प्रोसेसरने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचं झाले तर, या आगामी डिवाइसमध्ये रियरमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या आगामी स्मार्टफोनमध्ये 16MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. असं सांगितलं जात आहे की, कंपनीचा नवीन स्मार्टफोन स्नो व्हाइट, मिडनाइन ब्लॅक आणि सनराइज ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
2025 आणि टेक कंपनी Vivo ने Vivo T4 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता ज्यामध्ये 7300 mAh बॅटरी देण्यात आली होती.. याशिवाय वनप्लस 15 मध्ये देखील 7,300mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली होती. वनप्लस 15 ला टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आलेल्या iQOO 15 मध्ये कंपनीने 7,000mAh चा सिलिकॉन-एनोड बैटरी पैक दिला आहे.
Ans: Honor ही मूळची चीनची टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आधी ती Huawei ची सब-ब्रँड होती, पण आता स्वतंत्र कंपनी म्हणून कार्यरत आहे.
Ans: 2020 पर्यंत Honor ही Huawei ची सब-ब्रँड होती. त्यानंतर ती स्वतंत्र कंपनी झाली आणि आता Huawei पासून पूर्णपणे वेगळी आहे.
Ans: होय, सध्याचे Honor स्मार्टफोन्स पूर्णपणे Google Mobile Services (GMS) सपोर्ट करतात.