Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी कंपनीची कमाल! 7,000mAh बॅटरी अन् जबरदस्त फीचर्ससह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत खिशाला परवडणारी

Lava Smart 4 Pro Launched: लावा ने भारतात लावा स्मार्ट 4 प्रो हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज पर्याय देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2026 | 09:53 AM
देशी कंपनीची कमाल! 7,000mAh बॅटरी अन् जबरदस्त फीचर्ससह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत खिशाला परवडणारी

देशी कंपनीची कमाल! 7,000mAh बॅटरी अन् जबरदस्त फीचर्ससह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत खिशाला परवडणारी

Follow Us
Follow Us:
  • Lava ने नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लाँच केला
  • स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांहून कमी
  • लावा स्मार्ट 4 प्रो मध्ये कंपनीने स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल
Lava Smartphone Launched: टेक कंपनी Lava ने नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Lava Smart 4 Pro या नावाने लाँच करण्यात आला असून स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांहून कमी आहे. ज्या ग्राहकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे पण बजेट कमी आहे, अशा ग्राहकांसाठी कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे.

Huawei चा नवा मास्टरस्ट्रोक! जगातील पहिला नॉन-फोल्डेबल वाईड स्क्रीन फोन लाँच… प्रतिस्पर्ध्यांची वाढली चिंता

नुकताच लाँच करण्यात आलेला लावा स्मार्ट 4 प्रो हा कंपनीच्या लावा स्मार्ट 4 सीरीजमधील तिसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी या सिरीजअंतर्गत कंपनीने लावा स्मार्ट 4 आणि लावा स्मार्ट 4 प्लस हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. लावा स्मार्ट 4 प्रो मध्ये कंपनीने स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. (फोटो सौजन्य: Lava)

लावा स्मार्ट 4 प्रो ची किंमत

नवा लावा स्मार्ट 4 प्रो स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत कंपनीने 10,999 रुपये ठेवली आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन लावाच्या ऑफलाईन रिटेल चॅनेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. इतर लावा स्मार्टफोनप्रमाणेच कंपनी या स्मार्टफोनवर देखील मोफत डोरस्टेप सर्विस ऑफर करणार आहे. लावा स्मार्ट 4 प्रो स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये कोणार्क गोल्ड आणि नीलम ब्लू यांचा समावेश आहे.

लावा स्मार्ट 4 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या लावा स्मार्ट 4 प्रो स्मार्टफोनमध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 सह लाँच केला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ (720 x 1,570 पिक्सेल) एलसीडी टचस्क्रीन देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz पर्यंत आहे. हा लावा फोन पडण्यापासून आणि धक्क्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड प्रमाणपत्रासह येतो.

लावा स्मार्ट 4 प्रो स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T610 चिपसेट देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 12nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. यामध्ये 6 एफिसिएंसी कोर आणि 2 परफॉर्मेंस कोर देण्यात आले आहेत. या प्रोसेसरची पीक क्लॉक स्पीड 1.8GHz पर्यंत आहे. या फोनमध्ये 4GB रॅमसह 4 जीबीपर्यंत वर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 64GB चे ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे, ज्याला माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

GTA 6 पासून प्रेरित… Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु

नव्या लावा स्मार्ट 4 प्रो स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे, ज्यासोबत एलईडी फ्लॅश दिले आहे. या फोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. नव्या लावा स्मार्ट 4 प्रो स्मार्टफोनमध्ये 18W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Lava Smart 4 Pro स्मार्टफोनची भारतातील किंमत किती आहे?

    Ans: Lava Smart 4 Pro स्मार्टफोनची भारतातील किंमत 10,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.

  • Que: Lava Smart 4 Pro मध्ये किती mAh ची बॅटरी आहे?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत 18W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

  • Que: Lava Smart 4 Pro मध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये Unisoc T610 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे. याची पीक क्लॉक स्पीड 1.8GHz पर्यंत आहे.

Web Title: Lava smart 4 pro launched in india price is less than 12 thousand hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Huawei चा नवा मास्टरस्ट्रोक! जगातील पहिला नॉन-फोल्डेबल वाईड स्क्रीन फोन लाँच… प्रतिस्पर्ध्यांची वाढली चिंता
1

Huawei चा नवा मास्टरस्ट्रोक! जगातील पहिला नॉन-फोल्डेबल वाईड स्क्रीन फोन लाँच… प्रतिस्पर्ध्यांची वाढली चिंता

GTA 6 पासून प्रेरित… Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु
2

GTA 6 पासून प्रेरित… Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु

How to Use an Old Smartphone: कपाटात पडलेल्या जुन्या मोबाईलचा करा स्मार्ट वापर! 3 भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क
3

How to Use an Old Smartphone: कपाटात पडलेल्या जुन्या मोबाईलचा करा स्मार्ट वापर! 3 भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स… जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स
4

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स… जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.