
मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स... नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत
कंपनीने लाँच केलेल्या नव्या ऑनर एक्स 8ई 4G च्या 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत AZN 688 ते AZN 820 दरम्यान आहे. म्हणजेच स्मार्टफोनची किंमत सुमारे 35,000 ते 42,000 रुपयांदरम्यान आहे. हा फोन सनराईज ऑरेंज, डेझर्ट गोल्ड आणि व्हेलव्हेट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अजरबैजान वेबसाईटवर स्पॉट झाला आहे. (फोटो सौजन्य: X)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.87 इंच टीएफटी एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. डिस्प्लेमध्ये 1,020 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर आणि ॲड्रेनो 610 जीपीयू मिळणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.
फोनमध्ये रॅम टर्बो टेक्नोलॉजी देखील मिळणार आहे, जी वर्चुअल मेमरीच्या मदतीने रॅम 8GB+16GB रॅमच्या बरोबरीचा अनुभव देण्याचा दावा करते. फोनमध्ये एआय ईमेज टू व्हिडीओ 2.0 फीचर देखील मिळणार आहे. याशिवाय, एआय टूल्सच्या क्विक ॲक्सेससाठी एक डेडिकेटेड एआय बटन देखील मिळणार आहे. फोनमध्ये एनएफसी आणि ड्युअल नॅनो-सिम सपोर्ट मिळणार आहे.
स्मार्टफोनमध्ये 108MP चा प्रायमरी रियर कॅमेरा मिळणार आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. फोनमध्ये आणखी एक कॅमेरा लेंस देखील मिळणार आहे. या कॅमेऱ्याद्वारे 1080p रिझोल्यूशनपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते आणि यात 8x डिजिटल झूमची सुविधा आहे. डिव्हाईसच्या समोरील भागात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
याशिवाय, ऑनर एक्स 8ई 4G मध्ये 7,700mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच फोनमध्ये 45W ऑनर सुपरचार्ज वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP68, IP69 आणि IP69K रेटिंग मिळणार आहे.
Ans: Honor X8e 4G च्या 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत अझरबैजानमध्ये AZN 688 ते AZN 820 दरम्यान आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत अंदाजे 35,000 ते 42,000 रुपये आहे.
Ans: या स्मार्टफोनमध्ये 7,700mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत 45W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Ans: फोनच्या मागील बाजूला 108MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो.