
WhatsApp ग्रुपमध्ये आता होणार धमाल! लवकरच येणार 4 तगडे फीचर्स; जुन्या मेसेज ॲक्सेससह मिळणार या सुविधा
गुरुवारी शेअर करण्यात आलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये इंस्टेंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने घोषणा केली आहे की, व्हॉट्सॲप ग्रुप चॅट्ससाठी चार नवीन फीचर्स घेऊन येणार आहे. या फीचर्समध्ये यूजर्सना चॅट जिथे अर्धवट सोडले होते, तिथूनच पुढे सुरू करण्यास मदत होईल. नव्या अपडेटअंतर्गत, कंपनी आता यूजर्सना महत्त्वाचे मेसेज कायमस्वरूपी पिन करण्याची सुविधा देणार आहे. सध्या व्हॉट्सॲप यूजर्सना कोणत्याही ग्रुप चॅटमध्ये जास्तीत जास्त 24 तासांपर्यंत, सात दिवस आणि 30 दिवसांसाठी पिन करण्याची सुविधा मिळते. नवे फीचर जोडल्यानंतर यूजर्स व्हॉट्सॲप ग्रुप चॅट्समध्ये मेसेजना कायमस्वरुपी पिन करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
व्हॉट्सॲपने नव्या ग्रुप मेंबर्ससाठी देखील फीचर जारी करण्याची घोषणा केली आहे. व्हॉट्सॲपने एका अशा फीचरची घोषणा केली आहे, ज्याद्वारे ग्रुप चॅटमध्ये नवीन मेंबर सामील झाल्यानंतर त्यांना आधीची मेसेज हिस्ट्री पाहता येईल. ज्यामुळे ग्रुप चॅटमध्ये सुरु असलेला विषय त्यांना पुन्हा सांगावा लागणार नाही. ग्रुप ॲडमिन्स आणि मॅनेजर्स ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या मेंबर्सच्या नावावर टॅप करून रीसेंट मेसेजेस शेअर करू शकणार आहेत. हे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहेत. यापूर्वी व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन्सना केवळ नव्या मेंबर्सना ग्रुपमध्ये सहभागी होताना मेसेज हिस्ट्री शेअर करण्याची सुविधा देते होते. मात्र नव्या फीचरमुळे आता अशा मेंबर्ससोबत देखील हिस्ट्री शेअर करण्याचा पर्याय मिळणार आहे, ज्यांना ग्रुप ॲडमिन्स आणि मॅनेजर्स सुरुवातीला हिस्ट्री शेअर करण्यास विसरले होते.
यूजर्स आता ग्रुप चॅट्समध्ये मेसेज मेंशन्सच्या हिशोबाने फिल्टर करू शकणार आहेत. जेव्हा हा फिल्टर लागू केला जातो, तेव्हा चॅट विंडोमध्ये असे सर्व मेसेजेस हायलाइट केले जातील ज्यामध्ये त्या यूजरला टॅग केलेले आहे.
8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत
आता यूजर्सना ग्रुप मेंबर्ससह ग्रुप स्टेटस शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. हा स्टेटस केवळ त्याच खास ग्रुप चॅट्ससोबत शेअर केला जाणार आहे, ज्यांसाठी तो पोस्ट केला आहे.
Ans: WhatsApp ने ग्रुप चॅटसाठी एकूण चार नवीन फीचर्स आणि अपडेट्स आणण्याची घोषणा केली आहे.
Ans: होय. नवीन फीचरमुळे यूजर्स ग्रुप चॅटमधील महत्त्वाचे मेसेज 'Forever' म्हणजेच कायमस्वरूपी पिन करून ठेवू शकतील.
Ans: होय. ग्रुप ॲडमिन किंवा मॅनेजर नवीन मेंबरला ग्रुपमधील अलीकडील मेसेज हिस्ट्री शेअर करू शकतील.