8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत
9,000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा! OnePlus च्या नव्या सीरिजने स्मार्टफोन बाजारात खळबळ, वाचा फीचर्स
नवा ऑनर एक्स 9ई एस 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 1,499 साऊदी रियाल म्हणजेच सुमारे 38,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांसाठी हे नवीन डिव्हाईस डॉन ऑरेंज, ग्लेशियर व्हाईट आणि मिडनाईट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनसह कंपनी ऑनर कॉफी मग, एक वर्षाचे एक्सीडेंटल डॅमेज प्रोटेक्शन आणि बॅटरी कॅपिसीटीवर एका वर्षाची गॅरंटी सर्विस ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य: Honor)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या ऑनर एक्स 9ई एस मध्ये 6.79-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 1,800 निट्सची आहे.
ऑनरने लाँच केलेल्या लेटेस्ट हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेट देण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्राफीक्ससाठी एड्रेनो 810 जीपीयू दिले आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. सध्या कंपनीने हा स्मार्टफोन सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. तसेच हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालतो.
स्मार्टफोनच्या रिअर पॅनेलमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा सेकेंडरी अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
ऑनर स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, आणि एनएफसी सपोर्ट दिला आहे. यासोबतच फोनमध्ये यूएसबी-सी पोर्ट मिळणार आहे, जो USB 2.0 स्पीडला सपोर्ट करतो. बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.
गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
ऑनर स्मार्टफोनमध्ये 8,560mAh बॅटरी मिळणार आहे, ज्याची जाडी 7.76 mm आणि वजन 196 ग्रॅम आहे. स्मार्टफोन 80W चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर बॅटरी 3 दिवस टिकते.
Ans: Honor X9e S स्मार्टफोन नुकताच मिडल ईस्ट मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Ans: या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत SAR 1,499 म्हणजेच अंदाजे 38,000 रुपये आहे.
Ans: या फोनमध्ये 8,560mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी तीन दिवसांपर्यंत टिकू शकते.






