फोटो सौजन्य: X.com
नुकतेच KTM ने RC 160 ही त्यांची नवीन बाईक लाँच केली आहे. या बातमीत, आपण या बाईकच्या फीचर्स, इंजिन आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली
आघाडीची बाईक उत्पादक कंपनी केटीएमने भारतात त्यांची नवीन बाईक, केटीएम आरसी 160 लाँच केली आहे. कंपनीने या बाईकमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन दिले आहे.
KTM RC 160 मध्ये 164.2 cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमधून बाईकला 19 PS पॉवर आणि 15.5 Nm टॉर्क मिळतो. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या इंजिनच्या मदतीने ही बाईक कमाल 118 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते.
कंपनीकडून या बाईकमध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये इनवर्टेड फ्रंट फोर्क्स, मोनोशॉक रियर सस्पेन्शन, ट्यूबलेस टायर्स, 17 इंच अलॉय व्हील्स, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, ड्युअल-चॅनल ABS, 13.75 लीटर फ्यूल टँक, LED हेडलाईट, LED टेललाईट, LED इंडिकेटर्स, स्पोर्टी स्प्लिट हँडलबार, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सुपरमोटो मोडसह ड्युअल-चॅनल ABS, असिस्ट आणि स्लिपर क्लच तसेच नेव्हिगेशन सपोर्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.
Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?
भारतात KTM कडून ही नवी KTM RC 160 बाईकला 1.85 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे.
केटीएमची नवीन बाईक, RC 160 ही 150 ते 160 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये ती Yamaha R15 आणि Suzuki Gixxer 150 शी स्पर्धा करेल.






