पंढरपूर तहसील पुरवठा विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा उघड; रेशनकार्डसाठी नागरिकांचे हेलपाटे सुरुच
भारतातील नागरिकांसाठी भारत सरकारद्वारे रेशन कार्ड जारी केले जाते. भारतात राहणाऱ्या लोकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा शाळा – कॉलेजमधील कामांसाठी रेशन कार्डची आवश्यकता असते. भारतातील नागरिकांना त्यांच्या अनेक कामांसाठी रेशन कार्डची आवश्यकता असते. या डॉक्यमेंटमध्ये तुमची आणि तुमच्या कुटूंबियांची माहिती दिलेली असते. जसे की, तुमचं नाव, पत्ता आणि कुटूंबातील सदस्यांबाबत माहिती दिलेली असते. या रेशन कार्डद्वारे तुम्ही मोफत किंवा स्वस्त रेशन, गॅस कनेक्शन आणि इतर अनेक सरकारी योजनांचे फायदे घेऊ शकता.
भारत सरकारद्वारे देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये नागरिकांना कमी पैशांत किंवा मोफत धान्य दिले जाते, याशिवाय लाडकी बहिण योजना, शेतकरी योजना, यांसारख्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. पण अजूनही भारतातील अनेक नागरिकांकडे रेशन कार्ड नाही. नवीन रेशन कार्ड बनवायचं आहे, तर मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं, यामुळे अनेकजण रेशन कार्डसाठी अप्लाय करणं टाळतात. पण आता तुम्ही घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही काही सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या रांगेत थांबण्याची देखील गरज लागणार नाही. विशेष म्हणजे या कामासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही, घरबसल्या तुमचं काम देखील होणार आहे. रेशन कार्डसाठी घरबसल्या अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या डिव्हाईसवर UMANG अॅप डाउनलोड करावे लागेल. रेशन कार्डसाठी अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्रं असणं आवश्यक आहे, याच कागदपत्रांबद्दल जाणून घेऊया.