Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही
जगभरात अनेक मोठे तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत. याच तज्ज्ञांमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आता देखील आम्ही तुम्हाला तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा दोन तज्ज्ञांबाबत सांगणार आहोत. यामध्ये Mark Zuckerberg आणि Jeff Bezos यांचा समावेश आहे. Mark Zuckerberg आणि Jeff Bezos यांना जगभर ओळखलं जातं. तंत्रज्ञान क्षेत्रात सतत होणाऱ्या प्रगतीमध्ये या दोघांचाही मोलाचा वाटा आहे. एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मालक तर दुसरा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनचा संस्थापक. दोघांनाही जगभरात ओळखलं जातं, पण या दोघांपैकी सर्वात जास्त कमाई कोण करतं तुम्हाला माहिती आहे का?
टेक्नोलॉजी आणि इंटरनेटच्या जगात Mark Zuckerberg आणि Jeff Bezos यांनी धुमाकूळ घातला आहे. मेटा आणि अॅमेझॉन या दोन्ही प्लॅटफॉर्म्सनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्म्सद्वारे Mark Zuckerberg आणि Jeff Bezos जबरदस्त कमाई करतात. Mark Zuckerberg आणि Jeff Bezos हे दोघेही तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आहेत, पण या दोघांपैकी सर्वात जास्त कमाई कोण करतं? (फोटो सौजन्य – Pinterest)
Mark Zuckerberg बद्दल बोलायचं झालं तर तो मेटाचा सिईओ आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, Instagram, WhatsApp मेटाच्या मालकीचे आहेत. 2025 पर्यंत Mark Zuckerberg ची कमाई सुमारे 165 बिलियन डॉलर आहे. अलिकडच्या काळात, मेटाने त्यांच्या AI आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे कंपनीचे शेअर्स वेगाने वाढले आहेत. विशेषतः मेटा AI आणि क्वेस्ट सारख्या प्रोडक्ट्सच्या लोकप्रियतेमुळे झुकरबर्गच्या संपत्तीत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Amazon ला एक ऑनलाइन बुकस्टोरपासून सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी हा प्रवास पूर्ण करण्यामध्ये Jeff Bezos यांचा मोलाचा वाटा आहे. आता ही ई-कॉमर्स कंपनी अनेक क्षेत्रांमध्ये वर्चस्व गाजवत आहे. 2025 पर्यंत Jeff Bezos ची एकूण संपत्ती सुमारे 195 बिलियन डॉलर आहे. जरी ते आता Amazon चे CEO नसले तरी, कंपनीतील त्यांचा मोठा वाटा आणि ब्लू ओरिजिन सारख्या अंतराळ तंत्रज्ञान कंपन्यांमधील इंटरेस्ट यामुळे ते टॉप श्रीमंतांच्या यादीत आहेत.
कमाईबद्दल बोलायचं झालं तर Mark Zuckerberg ची संपत्ती 2023 आणि 2025 दरम्यान सर्वात जास्त वाढली आहे. Meta च्या शेअर्समध्ये झालेली प्रचंड वाढ आणि AI क्षेत्रातील त्यांची मजबूत पकड यामुळे Mark Zuckerberg ला पुन्हा एकदा जगातील टॉप 5 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याच वेळी, Jeff Bezos ची संपत्ती संथ गतीने वाढत आहे. परंतु त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग समाजसेवा आणि अंतराळ मोहिमांमध्ये गुंतवला आहे. नेटवर्थच्या वाढीबद्दल बोलायचे झाले तर, मार्क झुकरबर्ग खूप वेगाने पुढे जात आहे.