
Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स
जर तुम्हाला वारंवार एखादे फीचर ऑन करण्याचा कंटाळा येत असेल किंवा फीचर ऑन करण्यात अडचण येत असेल तर अशावेळी तुम्ही बॅक टॅपचा वापर करू शकता. या ट्रिकच्या मदतीने फोनच्या मागच्या बाजूला दोन किंवा तीन वेळा टॅप केल्यास स्क्रीनशॉट, कॅमेरा किंवा इतर शॉर्टकट ओपन होतात. तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर चालू करू शकता. यामुळे रोजचे जीवन आणखी स्मार्ट होईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोनचे लाईव्ह टेक्स्ट फीचर कोणत्याही फोटोवर लिहिलेला नंबर पत्ता किंवा टेक्स्ट कॉपी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. एवढंच नाही तर फोन नंबरवर कॉल करणं आणि लिंक ओपन करणं देखील या फीचर्सच्या मदतीने अगदी सहज करू शकता. हे फीचर विद्यार्थी आणि ऑफिस युजर्ससाठी फायद्याचे आहे.
जर तुम्ही फोनवर मोठे मोठे आर्टिकल वाचत असाल तर सफारीचे रिडर मोड तुमच्या डोळ्यांना आराम देणार आहे. हे फीचर वेब पेजवरून नको असलेल्या गोष्टी हटवून केवळ टेक्स्ट दाखवतो. यामुळे वाचन सोपे होते आणि लक्ष देखील विचलित होत नाही.
अजूनही असे अनेक लोकं आहेत ज्यांना माहितीची नाही की आयफोनचे नोट्स अॅप एक जबरदस्त डॉक्युमेंट स्कॅनर देखील आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणताही कागद स्कॅन करून पीडीएफ तयार करू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळा अॅप डाउनलोड करायची गरज नाही.
आयफोनच्या कीबोर्डमध्ये स्वाइप टायपिंग फिचर देखील देण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शब्द वेगवेगळा टाईप करण्याची गरज भासत नाही तर बोट फिरवताच तुमचे शब्द आपोआप तयार होतील. यामुळे टायपिंगची स्पीड प्रचंड वाढते.
जर नोटिफिकेशनमुळे वारंवार तुमचे लक्ष विचलीत होत असेल तर आशेवळी तुम्ही फोकस मोडचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही ठरवू शकता की कोणत्यावेळी कोणता अॅप किंवा कॉल येऊ शकतो. या फीचरमुळे तुम्हाला काम, झोप आणि पर्सनल लाईफ कंट्रोल करणं अगदी सोपं होणार आहे.
आयफोन तुम्हाला स्वतःच फोनच्या बॅटरी हेल्थबाबत माहिती देते. फोनमधील बॅटरी हेल्थ फीचरमुळे समजतं की फोनची बॅटरी किती मजबूत आहे आणि ती बदलण्याची गरज आहे की नाही. यामुळे फोनचा परफॉर्मन्स समजण्यासाठी मदत होते.
Ans: iPhone मध्ये स्मूद परफॉर्मन्स, मजबूत सिक्युरिटी, दीर्घकाळ अपडेट्स आणि प्रीमियम कॅमेरा क्वालिटी मिळते.
Ans: iPhone किती वर्षे अपडेट्स मिळतात?
Ans: iOS हे Apple चे ऑपरेटिंग सिस्टम आहे, जे फास्ट अपडेट्स, प्रायव्हसी फीचर्स आणि बग-फ्री अनुभव देते.