Tech Tips: तुम्ही खरेदी केलेला सेकंड हॅण्ड Smartphone चोरीचा तर नाही ना? एक SMS आणि समोर येईल सत्य
सध्या अनेक टेक कंपन्या त्याचे लेटेस्ट आणि प्रीमियम स्मार्टफोन लाँच करत आहेत. यातील काही स्मार्टफोनची किंमत तर लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. याच कारणामुळे अनेक लोकं सेकंड हॅण्ड स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. यामुळे महागडा प्रीमियम स्मार्टफोन बजेट किमतीत आणि स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळते. पण तुम्ही खरेदी केलेला सेकंड हॅण्ड स्मार्टफोन चोरीचा असेल तर?
प्रीमियम स्मार्टफोनची सेकेंड हॅण्ड विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमी पैशांच्या नादात लोकं यूज्ड प्रीमियम फोन खरेदी करतात. जर तुम्ही देखील सेकेंड हॅण्ड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. खरं तर सेकंड हॅण्ड स्मार्टफोन म्हणून अनेकदा दुकानदार तुम्हाला चोरीचा स्मार्टफोन विकतात. चोरी केलेला स्मार्टफोन खरेदी करणं तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणू शकते. त्यामुळे सेकंड हॅण्ड स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची तपासणी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्हाला समजू शकते की तुम्ही चोरी केलेला स्मार्टफोन चोरीचा आहे की नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
सेकंड हॅण्ड स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी तो चोरीचा आहे की नाही हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला केवळ एक मेसेज करायचं आहे. ज्यामुळे तुम्हाला अगदी सहज समजू शकते की तुम्ही खरेदी केलेला सेकंड हॅण्ड स्मार्टफोन चोरीचा असेल की नाही.
यानंतर तुम्हाला भारत सरकद्वारे एक मेसेज येईल. या मेसेजमध्ये तुम्हाला माहिती मिळेल की तुम्ही खरेदी केलेला सेकंड हॅण्ड स्मार्टफोन चोरीचा आहे की नाही. जर तुम्ही खरेदी केलेला सेकंड हॅण्ड स्मार्टफोन चोरीचा असेल तर मेसेजमध्ये blacklisted’ लिहिलेलं असणार आहे. जर तुम्ही चोरीचा फोन खरेदी केला तर तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. अशा परिस्थितीत, सेकंड हॅण्ड फोन खरेदी करण्यापूर्वी, फोनशी संबंधित आवश्यक माहिती मिळविण्यासाठी नेहमीच ही ट्रिक वापरा.