Tech Tips: एका Earbud मधून आवाज कमी येतोय? सर्विस सेंटरला जाण्याची गरज नाही, ही सेटिंग दूर करेल तुमची समस्या
तुम्ही ईअरबड्सचा वापर करता का? बस स्टॉप, ट्रेन, रिक्षा सर्वत्र तुम्हाला ईअरबड्सचा वापर करणारी माणसं पहायला मिळतील. कोणी गाणी ऐकत असतं तर कधी चित्रपट बघत असतं. आजूबाजूच्या गोंगाटापासून शांतता मिळवण्यासाठी आणि आपल्या संगीताच्या जगात हरवून जाण्यासाठी ईअरबड्स एक उत्तम गॅझेट आहे. एकदा ईअरबड्स कानात घातले की आपल्याला आजूबाजूच्या गोंधळापासून सुटका मिळते. ज्याप्रमाणे स्मार्टफोन आपली गरज बनली आहे, त्याचप्रमाणे सध्याच्या काळात ईअरबड्स देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे गॅझेट बनले आहे.
गाणी ऐकण्यापासून ते कॉल अटेंड करण्यापर्यंत सध्याच्या काळात प्रत्येकजण ईअरबड्सचा वापर करत आहेत. ईअरबड्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे छोटे आणि अधिक पोर्टेबल असतात. अनेकदा असं होतं की ईअरबड्सचा वापर करण्यात अडचण निर्माण होते. म्हणजे आपले एक ईअरबड व्यवस्थित सुरु असतात. पण दुसऱ्या ईअरबडमधून आवाज कमी येतो. त्यामुळे गाणी ऐकण्याची किंवा चित्रपट पाहण्याची मजा येत नाही. तसेच यामुळे अनेकदा कॉल अटेंड करण्यात देखील अनेक अडचणी येतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
अशा परिस्थतीत अनेक युजर्स घाबरतात आणि त्यांना काय करावं सूचत नाही. काही युजर्सना वाटतं की त्याचे ईअरबड्स खराब झाले आहेत. त्यामुळे ते सर्विस सेंटरमध्ये घेऊन जातात तर काहीजण नवीन ईअरबड्स देखील खरेदी करतात. पण एक ईअरबड खराब झाले तर नवीन ईअरबड्स खरेदी करण्याची किंवा ईअरबड्स सर्विस सेंटरमध्ये घेऊन जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमची ही समस्या सोडवू शकता. यासाठी तुम्हाला काही सेटिंग फॉलो करावी लागणार आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
खरं तर सध्याच्या अनेक स्मार्टफोनमध्ये ऑडियो बॅलेंस सेटिंग दिली जाते. ज्याच्या मदतीने तुम्ही लेफ्ट आणि राइट दोन्ही ईयरबड्सचा आवाज कंट्रोल करू शकता. जर ही सेटिंग बदलली, तर तुम्हाला एका ईयरबडमध्ये कमी आवाज ऐकू येतो आणि एका ईयरबडमध्ये जास्त आवाज ऐकू येतो. म्हणजे जर तुम्ही ते योग्यरित्या बॅलेंस केले नाही तर तुम्हाला इअरबड्समध्ये कमी किंवा जास्त आवाज येऊ शकतो. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन सर्वात आधी ऑडियो बॅलेंस तापासावा लागणार आहे. या ठिकाणी दोन्ही ईयरबड्समधील आवाज समान ठेवा. यामुळे तुमची समस्या अगदी सहज सोडवली जाऊ शकते. ही सेटिंग फॉलो केल्यानंतर देखील तुमची समस्या सोडवली जात नसेल तर तुम्ही इअरबड्सची बॅटरी आणि त्याचे फर्मवेअर देखील तपासले पाहिजे.
अनेकदा असं होतं की, इअरबड्स केसमध्ये व्यवस्थित बसत नाहीत, ज्यामुळे कधीकधी एक इअरबड व्यवस्थित चार्ज होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही ते नंतर वापरता तेव्हा एक इअरबड कमी आवाज निर्माण करतो. म्हणून, दोन्ही इअरबड्स पूर्णपणे चार्ज झाले आहेत याची खात्री करा.