Gemini AI चा रेट्रो ट्रेंड तर फॉलो केला... पण भविष्यात होणाऱ्या नुकसानांचं काय? तुम्ही शेअर केलेल्या फोटोचा असाही होऊ शकतो वापर
सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेट्रो ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलं असो किंवा मुली, प्रत्येकजण हा ट्रेंड फॉलो करत आहे. Gemini AI चा वापर करून युजर्स त्यांचे फोटो रेट्रो लूकमध्ये कन्व्हर्ट करत आहेत. खरं सांगायच तर हा ट्रेंड अतिशय मजेदार आहे. तुम्हाला केवळ तुमचा फोटो अपलोड करून आवडता प्रॉम्प्ट द्यायाच आहे. त्यानंतर काही क्षणातच Gemini AI तुमच्या फोटोला रेट्रो लुकमध्ये कन्व्हर्ट करते.
Gemini AI च्या मदतीने रेट्रो लूक ईमेज तयार करण्यासाठी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागतो. पण आपला फोटो कोतण्याही AI प्लॅटफॉर्मसोबत शेअर करणं सुरक्षित आहे का? रेट्रो ट्रेंड फॉलो करण्यासाठी अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांचे फोटो AI सोबत शेअर केले आहेत. पण हे फोटो शेअर करताना भविष्यात काय परिणाम होऊ शकतो, याचा कोणीच विचार केला नाही. AI सोबत फोटो शेअर करणं खरंच सुरक्षित आहे, AI आपल्या फोटोचा चुकीचा वापर करू शकतो, असे अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – threads)
डेटा स्टोरेज – तुम्ही अपलोड केलेले फोटो सिस्टममध्ये सेव्ह केले जाण्याची शक्यता असते, याचा वापर AI मॉडलला अधिक चांगलं बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.
वैयक्तिक ओळख – तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंमधून AI तुमचा चेहरा, बॅकग्राऊंडमधील वस्तू, लोकेशन आणि डॉक्यूमेंटसारखी माहिती गोळा करू शकते.
चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता – अपलोड केलेल्या फोटोमध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल तर त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.
अज्ञात वापर – अनेकदा कंपन्या तुम्ही अपलोड केलेल्या कंटेटचा वापर भविष्यातील मॉडेलला ट्रेनिंग देण्यासाठी देखील करू शकतात.
जर तुम्ही AI प्लॅटफॉर्मवर वस्तू किंवा दृष्यांचे फोटो अपलोड करत असाल, तर यामध्ये जास्त धोका नाही. मात्र जर तुम्ही वैयक्तिक फोटो शेअर करत असाल धोका वाढू शकतो. एआय त्या डेटाचा वापर करू शकते.