
Jio Choice Number: तुम्हालाही जिओचा खास VIP नंबर पाहिजे आहे का? मग, आताच फॉलो करा या स्टेप्स
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओचे भारतात सर्वाधिक युजर्स आहेत. याच युजर्सना चांगल्या नेटवर्कचा अनुभव करता यावा यासाठी कंपनी अनेक अपडेट आणि फीचर्स घेऊन येत असते. यामुळे युजर्सचा अनुभव सुधारतो आणि ते चांगल्या नेटवर्कचा वापर करू शकतात. अनेक नवीन अपडेट आणि फिचर्ससह कंपनी त्यांच्या युजर्सना जियो चॉइस नंबर सर्विसचा ऑप्शन देखील देते. या ऑप्शनमध्ये युजर्स त्यांच्यासाठी एक खास व्हिआयपी नंबर निवडू शकतात.
जियो चॉइस नंबर सर्विसच्या मदतीने तुम्ही डेट ऑफ बर्थ, वाहन नोंदणी किंवा तुमचा कोणताही आवडता नंबर निवडू शकता. यासाठी युजर्सना अगदी सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. ही सर्विस प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही युजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जियो चॉइस नंबर एक कस्टमाइज्ड मोबाइल नंबर आहे. जो यूजर त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात. तुम्ही ही सर्विस निवडल्यास तुम्हाला कोणताही रँडम नंबर नाही तर तुम्ही निवडलेला नंबरच दिला जाणार आहे. या सर्विसमध्ये युजर्स एक खास कॉम्बिनेशनसह एक फँसी नंबर निवडू शकतात, जसं की रिपीटेड नंबर, एक खास पॅटर्न वाला नंबर किंवा कोणताही असा नंबर जो तुमच्यासाठी खास असेल. जिओ त्यांच्या युजर्सना विविध प्रकारचे फँन्सी नंबर ऑफर करतो, ज्यामध्ये VIP नंबर, लकी नंबर आणि स्पेशल बिजनेस नंबर यांचा समावेश आहे.
VIP नंबर: VIP नंबरमध्ये युजर्सना अनोखे पॅटर्न किंवा रिपीटेड नंबर वाले प्रीमियम नंबर दिले जातात.
लकी नंबर: यामध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ, एनिवर्सरी किंवा वाहन नोंदणी नंबरच्या आधारावर नंबर दिले जातात.
बिजनेस नंबर: तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी योग्य ठरेल असा नंबर देखील कंपनी देते.
जियो कस्टमर्स चॉइस नंबरसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करू शकतात.