भारतातील युजर्सना Sony Xperia 1 VII ची प्रतिक्षा! स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, फोटोग्राफर्ससाठी ठरणार वरदान
भारतीय बाजारात आतापर्यंत असे अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत, जे त्यांच्या कॅमेरा क्वालिटीसाठी ओळखले जातात. कॅमेरा क्वालिटीसाठी ओळखले जाणारे हे स्मार्टफोन फोटोग्राफर्ससाठी अत्यंत फायद्याचे ठरतात. असाच एक कॅमेरा स्मार्टफोन आता सोनीने लाँच आहे. Sony Xperia 1 VII मंगळवारी यूरोपीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. सोनीचा नवीन Xperia सीरीज फोन Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे. शिवाय हा स्मार्टफोन तीन रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
हँडसटमध्ये Sony Alpha टेक्नोलॉजीने सुसज्ज असेलला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. लाँच करण्यात आलेला हा नवीन स्मार्टफोन फोटोग्राफर्ससाठी अत्यंत खास ठरणार आहे. याचं कारण म्हणजेया स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी अत्यंत कमाल आहे. त्यामुळे आता भारतातील स्मार्टफोन युजर्स या नवीन स्मार्टफोनची वाट पाहत आहेत. जर हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आा तर तो नक्कीच बाजारात धुमाकूळ घालणार आहे आणि इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवणार आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: X)
Sony Xperia 1 VII ची किंमत 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 1,399 GBP म्हणजेच सुमारे 1,56,700 रुपये आहे. हा स्मार्टफोन मॉस ग्रीन, ऑर्चिड पर्पल आणि स्लेट ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदासाठी उपलब्ध आहेत. या फोनला यूरोपीय मार्केटमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे.
डुअल SIM (नॅनो+eSIM) Sony Xperia 1 VII अँड्रॉयड 15 वर चालतो, ज्यामध्ये सोनी चार मेजर OS अपग्रेड आणि 6 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स दिले जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच फुल-HD+ (1,080×2,340 पिक्सल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 100 परसेंट DCI-P3 कलर गॅमट कवरेज आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन आहे. डिस्प्लेमध्ये Sony Bravia ट्यूनिंग आहे. यामध्ये पुढे आणि पाठीमागे सेंसर आहे. हँडसेटमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन आहे.
Sony Xperia 1 VII मध्ये Snapdragon 8 Elite मोबाइल प्लॅटफॉर्म, 12GB RAM आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. मेमरीला माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी, Sony Xperia 1 VII मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 1/1.3-इंच Sony Exmor T सेंसर 24mm फोकल लेंथसह 48-मेगापिक्सल प्रायमरी आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 170mm ऑप्टिकल झूमसह 12-मेगापिक्सल 1.3.5-इंच Sony Exmor RS सेंसर आणि 16mm फोकल लेंथसह 48-मेगापिक्सल Sony Exmor RS 1/1.56-इंच सेंसर आहे.
नवीन अल्ट्रावाइड कॅमेरा Sony Xperia 1 VI च्या 12-मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेंसरने अपग्रेड आहे. कॅमेरा सेटअप Sony Alpha कॅमेरा डिवीजला सपोर्ट करतो. कॅमेरा यूनिट 30 fps AF/AE बर्स्ट शॉट, 4K casualties120fps HDR व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. यामध्ये फ्रंटला 12-मेगापिक्सल सेल्फी शूटर आहे.
सोनी Xperia 1 VII मध्ये Walkman-सीरीज कंपोनेंट्स आणि स्टीरियो स्पीकर्स आहे. हे LDAC, DSEE, Dolby Atmos, 360 Reality Audio आणि Qualcomm aptX एडॅप्टिव सारख्या ऑडियो फीचर्सला सपोर्ट करतो. यामध्ये 3.5mm ऑडियो जॅक, ब्लूटूथ 5, GPS/AGPS, GLONASS, NFC, USB टाइप-C पोर्ट आणि Wi-Fi 6 कनेक्टिविटी आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे.
गेमर्ससाठी Lenovo घेऊन आलाय खास Tablet! 7600mAh बॅटरी आणि मिळणार हे खास फीचर्स, किंमत केवळ इतकी
Sony Xperia 1 VII मध्ये Remote Play कंपॅटिबिलिटी, गेम एन्हांसर, FPS ऑप्टिमाइजर आणि 240Hz टच स्कॅनिंग रेटसारखे गेमिंग फीचर्स आहेत. यामध्ये वॉटर रेजिस्टेंससाठी IPX5 आणि IPX8 रेटेड बिल्ड आणि डस्ट रेजिस्टेंससाठी IP6X-सर्टिफाइड बिल्ड आहे.
नवीन सोनी Xperia 1 VII 5,000mAh बॅटरीसह 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.