हॅलो- हॅलो, आवाज येत नाहीये? वारंवार कॉल ड्रॉप होतोय? मग, तुमच्यासाठी मोलाच्या ठरतील या Tech Tips
दिवसभरात आपण अनेक लोकांना कॉल करतो. पण एखाद्या व्यक्तिला कॉल लागला नाही किंवा कॉलवर आवाज येत नसेल तर आपली चिडचिड होते. जर एखादी इमरजेंसीची परिस्थिती असेल आणि अशावेळी कॉल ड्रॉप झाला तर तळपायाची आग मस्तकात जाते. खराब नेटवर्क किंवा कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे अनेकदा आपली कामं अडकतात. अनेकदा कॉल ड्रॉप होताना आपल्याला मोठ्या – मोठ्याने हॅलो – हॅलो असं देखील ओरडावं लागतं. तुम्ही देखील अशा समस्यांचा सामना करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
कॉलवर बोलताना काही गोष्टींची काळजी घेणं आणि तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वारंवार कॉल ड्रॉप होण्याच्या समस्येने तुम्ही वैतागला असाल तर आता आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या ट्रीक्स घेऊन आलो आहोत. या ट्रीक्सच्या मदतीने कॉल ड्रॉप होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कॉल ड्रॉप होण्याची अनेक कारणं असू शकतात. जर तुमचा नेटवर्क किंवा सिग्नल कमजोर असेल तर तुमचा कॉल ड्रॉप होऊ शकतो आणि तुमचं फोनवरील बोलणं अपूर्ण राहू शकतं. एकाच वेळी एकाच सेल टॉवरशी एकापेक्षा जास्त यूजर जोडलेले असल्याने देखील ही समस्या उद्भवते. शिवाय, फोनच्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमध्ये बिघाड असल्यास देखील कॉल ड्रॉप सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. या समस्येपाससून वाचण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता.
कमकुवत सिग्नल एरिया टाळण्यासाठी तुमचे लोकेशन तपासा. जर सिग्नल कमकुवत असेल तर चांगले नेटवर्क असलेल्या भागात जा, ज्यामुळे तुम्हाला कॉलिंगमध्ये समस्या येणार नाहीत.
बऱ्याचदा, सॉफ्टवेअर अपडेट्समुळे फोनच्या नेटवर्क कनेक्टिव्हिटी समस्या दूर होतात. तुम्ही तुमचा फोन नेहमी अपडेट ठेवावा.
नेहमी योग्य नेटवर्क मोडवर रहा. जर तुमचा फोन 4G ला सपोर्ट करत असेल, तर नेटवर्कवरील भार कमी करण्यासाठी तो 4G मोडवर सेट करा.
जर कॉल वारंवार ड्रॉप होत असतील तर फोनची नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा. हे अनेकदा कनेक्टिव्हिटी समस्यांचे निराकरण करते.
तुमचा फोन अशा ठिकाणी ठेवा जिथे सिग्नलमध्ये अडथळा येत नाही. काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा भिंती सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात. या सोप्या टिप्सचा अवलंब करून, तुम्ही कॉल ड्रॉप्सची समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवू शकता आणि तुमचं कॉलवरील संभाषण पूर्ण करू शकता.