
Tech Tips: एकाचवेळी 4 डिव्हाईसवर वापरू शकता तुमचं WhatsApp अकाऊंट, 99% लोकांना माहिती नाही ही स्मार्ट ट्रिक
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअॅपचे करोडो युजर्स आहेत. यातील काही युजर्स असे आहेत, जे त्यांचं व्हाट्सअॅप अकाऊंट स्मार्टफोनसोबतच इतर डिव्हाईसवर देखील वापरतात. याचा अर्थ असा आहे की, तुमचं व्हाट्सअॅप अकाऊंट केवळ तुमच्या स्मार्टफोनपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर आता तुम्ही तुमचं व्हाट्सअॅप अकाऊंट लॅपटॉप, डेस्कटॉप अॅप, टॅबलेट आणि व्हाट्सअॅप वेबवर देखील वापरू शकता. या सर्व डिव्हाईसवर तुम्ही एकाचवेळी लॉगिन करू शकता. जे लोकं लॅपटॉप किंवा कंम्युटरवर काम करत असाल आणि तुम्हाला व्हाट्सअॅपची गरज पडत असेल तर तुम्हाला वारंवार फोन घेण्याची गरज नाही. तुम्ही एकाचवेळी 4 डिव्हाईसवर लॉगिन करू शकणार आहात.
आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर
डिव्हाईस लॉगिन करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर व्हाट्सअॅप ओपन करा. वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा. इथे तुम्हाला Linked devices चा ऑप्शन दिसणार आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला QR-कोड स्कॅन करावा लागेल. तुम्हाला ज्या डिव्हाईसवर तुमचं व्हाट्सअॅप अकाऊंट सुरु करायचं आहे, त्या डिव्हाईसवर व्हाट्सअॅप वेब सर्च करा. सर्च रिझल्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक QR- कोड दिसेल. हा कोड तुम्हाला स्मार्टफोनवरून स्कॅन करावा लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यानंतर तुम्ही ज्या डिव्हाईसवर QR- कोड स्कॅन केला आहे तिथे देखील तुमचे व्हाट्सअॅप अकाऊंट ओपन होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकाचवेळी 4 डिव्हाईसवर तुमचं व्हाट्सअॅप अकाऊंट लॉगिन करू शकणार आहेत. तुम्ही व्हाट्सअॅप सेटिंगमधील Linked devices ऑप्शनवर क्लिक करून तुमचं व्हाट्सअॅप अकाऊंट कोणत्या – कोणत्या डिव्हाईसवर लॉगिन आहे, हे पाहू शकता. जर तुम्हाला एखाद्या डिव्हाईसवरून तुमचे व्हाट्सअॅप अकाऊंट लॉगआऊट करायचे असेल तर तुम्ही Linked devices सेक्शनमध्ये जाऊन त्या डिव्हाईसच्या नावावर टॅप करू शकता. यानंतर तुम्हाला लॉगआऊटचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
व्हाट्सअॅपचे हे फीचर अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जे लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर काम करतात आणि त्यांना सतत व्हाट्सअॅपची गरज असते. तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही फोनमधून किंवा संबंधित डिव्हाईसवरून देखील तुमचं व्हाट्सअॅप अकाऊंट लॉगआऊट करू शकता. ज्यामुळे तुमची सुरक्षा टिकून राहणार आहे. याशिवाय तुमचे चॅट्स देखील सुरक्षित राहतील.
Chhath Puja 2025: घरबसल्या तयार करा तुमचे आवडते फोटो, महागड्या DSLR चीही गरज नाही! फॉलो करा या टिप्स
कोणत्याही डिव्हाईसवर तुमचं व्हाट्सअॅप अकाऊंट लॉगिन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेच आहे. सर्वात पहिले तुम्हाला ज्या डिव्हाईसवर व्हाट्सअॅप लॉगिन करायचं आहे ते डिव्हाईस आणि व्हाट्सअॅप वर्जन अपडेटेड असणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही ज्या सार्वजनिक कंप्यूटरवर लॉगिन करणार आहात, तिथून तुमचं काम झाल्यानंतर लॉग आऊट करणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या अकाऊंटची सुरक्षा टिकून राहण्यासाठी मदत होणार आहे. हे वैशिष्ट्य विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे ऑफिसमध्ये संगणकावर काम करतात किंवा ज्यांच्याकडे घरी टॅबलेट, ऑफिसमध्ये लॅपटॉप आणि पोर्टेबल डेस्कटॉप अशी वेगवेगळी उपकरणे आहेत.