Tech Tips: स्मार्टफोन कंपनीने तुम्हाला नकली चार्जर तर नाही दिला? सत्य जाणून घेण्यासाठी हे सरकारी ॲप करेल तुमची मदत
स्मार्टफोनद्वारे आपण अनेक काम करू शकतो. पण ही काम करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंग असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्या स्मार्टफोनची बॅटरी संपली आणि स्मार्टफोन बंद झाला तर आपली अनेक काम रखडू शकतात. सध्या बहुतेक स्मार्टफोन टाइप सी पोर्टसह येतात. त्यामुळे अनेक स्मार्टफोनसाठी आपण एकच चार्जर वापरू शकतो. तुमच्या स्मार्टफोनची चार्जिंग फास्ट होण्यासाठी आणि बॅटरी लाइफ दीर्घकाळ टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते चार्जर. जर तुम्ही डुप्लिकेट किंवा लोकल चार्जर वापरला तर स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे स्मार्टफोन नेहमीच ओरिजिनल चार्जरने चार्ज करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन दुसरा एखादा चार्जर किंवा लोकल चार्जरने चार्ज करत असाल तर तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होऊ शकतो. अनेकदा लोकल आणि नकली चार्जरमुळे स्मार्टफोन ब्लास्ट होण्याचा धोका असतो. यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या स्मार्टफोन चार्जरच्या बाबतीत सतर्क असणं आवश्यक आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा चार्जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे तुमच्या अनेक समस्या चुकीसरशी सोडवल्या जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
नकली चार्जर आपल्या स्मार्टफोनच्या ओव्हरहिटिंगचे कारण बनू शकते. अनेकदा असं होतं की जेव्हा आपला चार्जर खराब होतो तेव्हा आपण मोबाईल शॉपमध्ये जाऊन नवीन चार्जर खरेदी करतो. मात्र हा चार्जर ओरिजिनल आहे की नकली याबाबत आपल्याला माहितच नसतं. जर चार्जर नकली किंवा लोकल चार्जर खरेदी करतो, यामुळे आपला स्मार्टफोन खराब होऊ शकतो. तसंच ओव्हर हिटिंगची समस्या देखील निर्माण होऊ शकते. जर तुम्ही थोडे सतर्क राहिलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही खरेदी केलेला चार्जर ओरिजिनल आहे की नकली. यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
BIS Care App च्या मदतीने तुम्ही अगदी सहज ओळखू शकता की तुम्ही खरेदी केलेला चार्जर ओरिजिनल आहे की नकली आहे. BIS हा भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कंज्यूमर अफेयर, फूड एंड पब्लिक डिस्ट्रीब्यूशनअंतर्गत काम करते. BIS भारतात विकल्या जाणाऱ्या वस्तुंसाठी एक क्वालिटी सर्टिफिकेशन संस्था आहे. BIS Care App चा वापर प्रत्येक मोबाइल फोन यूजर करू शकतो. या ॲपच्या मदतीने तुम्ही अगदी सहज ओरिजनल आणि नकली चार्जर मधील फरक ओळखू शकता.