Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही ‘ही’ प्रोसेस

गूगल सर्चमध्ये वैयक्तिक डिटेल्स दिसत आहेत का? चिंता करू नका. तुम्ही ही माहिती हटवण्यासाठी गूगलला ऑनलाईन विनंती पाठवू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2026 | 11:11 AM
Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही 'ही' प्रोसेस

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही 'ही' प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • एका विनंतीद्वारे तुमचा डेटा गूगल सर्चमधून हटवू शकता
  • गूगल सर्चमध्ये दिसत असलेली वैयक्तिक माहिती हटवण्यासाठी ऑनलाईन विनंती पाठवू शकता
  • इंटरनेटचा वापर करताना सावध राहणं गरेजंच
इंटरनेट आणि स्मार्टफोन हे दोन्ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे भाग आहेत. आपण दिवसभर विविध कामांसाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करत असतो. यासाठी आपण विविध वेबसाईट्स आणि ॲप्सवर लॉगिन देखील करतो. खरं तर आजच्या काळात गूगलसारख्या वेबसाईट आणि ॲप्सवर लॉगिन करणं अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अशा पद्धतीने आपले विविध पर्सनल डिटेल्स इंटरनेटवर सेव्ह केले जातात. यामध्ये केवळ मोबाईल नंबरच नाही तर ईमेल आयडी, घरचा पत्ता आणि इतर वैयक्तिक माहिती देखील समाविष्ट असते.

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत

काहीवेळेस गूगल सर्चद्वारे देखील ही माहिती समोर येते. यामुळे यूजर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी धोक्यात येऊ शकते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. कारण गूगल त्यांच्या यूजर्सना काही वैयक्तिक डिटेल्स सर्च रिझल्टमधून हटवण्यासाठी विनंती करण्याती सुविधा देतो. तुम्ही केवळ एका विनंतीद्वारे तुमचा डेटा गूगल सर्चमधून हटवू शकता.  (फोटो सौजन्य – AI Created) 

गूगल सर्चमधून वैयक्तिक डिटेल्स कसे हटवू शकता?

  • जर तुमची वैयक्तिक माहिती गूगल सर्चमध्ये दिसत असेल तर तुम्ही ही माहिती हटवण्यासाठी ऑनलाईन विनंती पाठवू शकता.
  • सर्वात आधी गूगलच्या रिझल्ट्स अबाऊट यू टूलवर जा.
  • इथे यूजर्स त्यांच्या पर्सनल डिटेल्ससंबंधित सर्च रिझल्ट्स ट्रॅक करू शकणार आहेत.
  • तसेच यूजर्स इथेच काही वैयक्तिक माहिती हटवण्याची विनंती देखील करू शकतात.
  • यासाठी गूगल अकाऊंटमध्ये लॉगिन करा आणि रिझल्ट्स अबाऊट यू फीचर ओपन करा.
  • यानंतर तुमचे डिटेल्स, जसे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आईडी आणि घराचा पत्ता नोंदवा.
  • तुम्ही एंटर केलेले डिटेल्स जर एखाद्या सर्च रिझल्टमध्ये दिसत असतील तर त्याला रिव्ह्यू करून रिमूवल रिक्वेस्ट पाठवा.
इतकंच नाही तर गुगल सर्चमध्ये जर तुमची संवेदनशील वैयक्तिक माहिती दिसत असेल, तर तुम्ही गुगलच्या पर्सनल इंफॉर्मेशन रिमूवल पेजवर जाऊन विनंती करू शकता. तुमच्या विनंतीचे पुनरावलोकन केल्यानंतर, गुगल हे ठरवते की सर्च रिझल्टमधून ती माहिती काढून टाकता येईल की नाही.

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

लक्षात ठेवा

गूगल सर्चमधून एखादी माहिती हटवण्याचा अर्थ असा नाही की ही माहिती इंटरनेटवरून पूर्णपणे डिलीट करण्यात आली आहे. ज्या वेबसाइटवर हे डिटेल्स मूळतः पोस्ट केले होते, तिथे ते कदाचित अजूनही उपलब्ध असू शकतात. यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, इंटरनेटचा वापर करताना सावध राहणं गरेजंच आहे. कोणत्याही वेबसाईटवर लॉगिन करण्यापूर्वी वेबसाईट व्यवस्थितपणे तपासणं गरजेचं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Search मधून वैयक्तिक माहिती हटवता येते का?

    Ans: होय, Google च्या माध्यमातून मोबाईल नंबर, ईमेल आयडी, घरचा पत्ता यांसारखी काही वैयक्तिक माहिती सर्च रिझल्टमधून हटवण्याची विनंती करता येते.

  • Que: Google वरून कोणती वैयक्तिक माहिती हटवण्याची विनंती करता येते?

    Ans: मोबाईल नंबर, ईमेल अ‍ॅड्रेस, घरचा पत्ता आणि इतर संवेदनशील वैयक्तिक माहिती हटवण्याची विनंती करता येऊ शकते.

  • Que: Google Search मधून वैयक्तिक माहिती हटवण्यासाठी काय करावे?

    Ans: Google च्या Results about you या सुविधेचा वापर करून वैयक्तिक माहिती असलेले सर्च रिझल्ट तपासता येतात आणि ती हटवण्यासाठी विनंती करता येते.

Web Title: How to remove personal information from google search results here is step by step guide hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत
1

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स
2

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या
3

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
4

Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.