Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

आपला स्मार्टफोन चोरी झाला किंवा हरवला तर फोनमधील डेटाचा चुकीचा वापर होऊ नये, अशी भिती सर्वांच्या मनात असते. पण यासाठी नेमकं काय करावं हे अनेकांना माहिती नसतं. स्मार्टफोनची सुरक्षा वाढवण्याठी काही सुरक्षा फीचर्स दिलेले असतात, त्यांचा तुम्ही वापर करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2026 | 07:00 AM
Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा 'या' सेटिंग... जाणून घ्या

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा 'या' सेटिंग... जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोनची सुरक्षा वाढवण्यासाठी वापरा हे सुरक्षा फीचर्स
  • सिक्योरिटी फीचर्स वापरण्यासाठी डिव्हाईसमध्ये स्क्रीन लॉक सेट असणं गरजेचं
  • मोशन सेंसर, वाय-फाय आणि ब्लूटूथद्वारे मिळणाऱ्या संकेतांच्या मदतीने चोरीसारख्या ॲक्टिव्हिटी ओळखल्या जातात
स्मार्टफोन चोरी झाल्यानंतर किंवा हरवल्यानंतर सर्वात मोठी भिती असते की डिव्हाईसमधील फोटो, यूपीआय अकाऊंट्स, बँकिंग डिटेल्स आणि इतर महत्त्वाची माहिती चुकीच्या हाती लागू नये. यूजर्सची हीच चिंता लक्षात घेऊन आता अनेक कंपन्या स्मार्टफोनमध्ये काही सिक्योरिटी फीचर्स ऑफर करतात. ज्यामुळे यूजर्सची सुरक्षा वाढते आणि फोन चोरी झाला किंवा हरवला तरी तुमच्या संरक्षण केले जाऊ शकते.

Android असो किंवा iPhone… सॉफ्टवेअर अपडेटनंतर हे काम करणं महत्त्वाचं! दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

थेफ्ट प्रोटेक्शन

सर्वात आधी स्मार्टफोन सेटिंग ओपन करा. गूगलमध्ये जा आणि ऑल सर्विस पर्यायावर टॅप करा. इथे पर्सनल अँड डिव्हाईस सेफ्टी सेक्शनमध्ये थेफ्ट प्रोटेक्शन पर्याय दिसेल, तो ऑन करा. फीचरचा वापर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये स्क्रीन लॉक सेट असणं गरजेचं आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

थेफ्ट डिटेक्शन लॉक

जेव्हा तुमचा फोन चोरीला जातो. तेव्हा मोशन सेंसर, वाय-फाय आणि ब्लूटूथद्वारे मिळणाऱ्या संकेतांच्या मदतीने चोरीसारख्या ॲक्टिव्हिटी ओळखल्या जातात आणि अशा परिस्थितीत फोनची स्क्रीन आपोआप लॉक होऊ शकते. सेटिंग ओपन करून गूगलमध्ये जा आणि ऑल सर्विस पर्यायामधील थेफ्ट डिटेक्शन लॉक चालू करा.

ऑफलाईन डिव्हाईस लॉक

फोन चोरी केल्यानंतर ट्रॅक करता येऊ नये, यासाठी चोर फोनचे इंटरनेट बंद करतात. अशावेळी ऑफलाईन डिव्हाईस लॉक फायद्याचे ठरते. हे फीचर फोन इंटरनेटपासून डिस्कनेक्ट झाल्यानंतर काही वेळातच फोनची स्क्रीन लॉक करू शकते. सेटिंग ओपन करून गूगलमध्ये जा आणि ऑल सर्विस पर्यायामधील थेफ्ट प्रोटेक्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला ऑफलाईन डिव्हाईस लॉक पर्याय दिसेल तो चालू करा.

रिमोट लॉक

जर तुमचा फोन चोरी झाला किंवा हरवला तर तुम्ही दुसऱ्या फोनच्या किंवा कंप्युटरच्या मदतीने स्क्रीन लॉक करण्याची विनंती पाठवू शकता. यासाठी सर्वात आधी थेफ्ट प्रोटेक्शन सेटिंगमध्ये जाऊन रिमोट लॉक ऑन करा आणि तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करा. फोन चोरी झाल्यानंतर दुसऱ्या डिव्हाईसच्या ब्राऊझरमध्ये android.com/lock ओपन करा. आता तुम्हाला काही व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. यानंतर तुम्ही चोरी झालेला फोन लॉक करण्यासाठी विनंती पाठवू शकता. यासाठी फोनमध्ये स्क्रीन लॉक, ॲक्टिव्ह सिम, व्हेरिफाइड फोन नंबर आणि फाईंड हबची सुविधा असणं गरजेचं आहे.

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

आयडेंटीटी चेक

आयडेंटीटी चेक एक एक्सट्रा सिक्योरिटी फीचर आहे. यामध्ये विशिष्ट क्षेत्रानंतर संवेदनशील सेटिंग्स आणि अकाऊंटसंबंधित काम करण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनची मागणी केली जाते. यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीसाठी फोनची सिक्योरिटी सेटिंग्स बदलणं किंवा अकाऊंटसंबंधित ॲक्टिव्हिटीवर नजर ठेवणं जातं. सेटिंग ओपन करून गूगलमध्ये जा आणि ऑल सर्विस आणि थेफ्ट प्रोटेक्शन ओपन करा. यानंतर आयडेंटीटी चेक पर्याय निवडा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. या फीचरचा वापर करण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकसारख्या बायोमेट्रिक पर्याय आणि स्क्रीन लॉकची गरज असते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टफोन चोरी झाल्यास वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी?

    Ans: फोनमधील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी थेफ्ट प्रोटेक्शन, थेफ्ट डिटेक्शन लॉक, ऑफलाइन डिव्हाइस लॉक आणि रिमोट लॉक यांसारखी सिक्युरिटी फीचर्स सुरू ठेवा.

  • Que: थेफ्ट डिटेक्शन लॉक म्हणजे काय?

    Ans: हे फीचर फोन चोरीसारखी हालचाल ओळखण्याचा प्रयत्न करते. संशयास्पद हालचाल आढळल्यास फोनची स्क्रीन आपोआप लॉक होऊ शकते.

  • Que: ऑफलाइन डिव्हाइस लॉकचा काय उपयोग होतो?

    Ans: फोन इंटरनेटपासून डिस्कनेक्ट झाल्यानंतर काही परिस्थितींमध्ये हे फीचर स्क्रीन लॉक करते, ज्यामुळे अनधिकृत व्यक्तीला फोन वापरणे कठीण होते.

Web Title: Is smartphone stolen or lost enable these 5 security features to protect your personal data and upi accounts hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
1

Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा
2

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा

Android असो किंवा iPhone… सॉफ्टवेअर अपडेटनंतर हे काम करणं महत्त्वाचं! दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान
3

Android असो किंवा iPhone… सॉफ्टवेअर अपडेटनंतर हे काम करणं महत्त्वाचं! दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स
4

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.