Tech Tips: कॉलिंगवेळी येणाऱ्या बॅकग्राऊंड आवाजामुळे तुम्हीही वैतागलात? Android ची ही सेटिंग संपवेल तुमच्या सर्व समस्या
आजच्या डिजिटल काळात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्याच्या काळात स्मार्टफोन आपली गरज बनला आहे. कॉलिंग, चॅटिंगपासून ऑनलाईन पेमेंट आणि शॉपिंगपर्यंत आपला स्मार्टफोन आपल्याला सर्व कामांत मदत करतो. स्मार्टफोन आपली अनेक कामं अगदी चुटकीसरशी करतो.
कॉलिंग, व्हिडीओ कॉल, डॉक्यूमेंट शेयरिंग, ऑनलाइन पेमेंट, एंटरटेनमेंट सारखी अनेक कामं स्मार्टफोनद्वारे केली जाऊ शकतात. स्मार्टफोनमध्ये असे अनेक फीचर असतात, जे आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय फोनमध्ये काही कामाच्या सेटिंग देखील असतात. आता आम्ही तुम्हाला फोनमधील अशाच एका सेटिंग बदल सांगणार आहोत. ही अशी सेटिंग आहे, जी कॉलिंगवेळी तुम्हाला बरीच फायद्याची ठरणार आहे. ही सेटिंग अँड्रॉइड यूजरसाठी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी बरीच फायद्याची ठरणार आहे. आता आम्ही तुम्हाला अँड्रॉइडमधील अशी एक सेटिंग सांगणार आहोत, जी तुम्हाला रोजच्या जीवनात बरीच फायद्याची ठरणार आहे. अनेकदा असं होतं की आपल्याला आउटडोर कंडीशनमध्ये एखाद्या व्यक्तीला कॉल करावा लागतो, मात्र बाहेरील आवाजामुळे आपला आवाज समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. अशावेळी तुम्ही कॉलवर व्यवस्थित बोलू शकत नाही. मात्र आता आम्ही तुम्हाला अशा एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत ज्याने कॉलिंगमधील बॅकग्राऊंड आवाजाची समस्या पूर्णपणे संपणार आहे.
तुमच्या स्मार्टफोनमधील ही कॉलिंगची समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची गरज नाही. अँड्रॉइड स्मार्टफोन त्यांच्या युजर्सना एक कामाल सेटिंग ऑफर करतो, ज्याच्या मदतीने कॉलिंगवेळी येणारी बॅकग्राऊंड आवाजाची समस्या अगदी सहज सोडवली जाऊ शकते. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये हे फीचर ऑन करून या समस्येने सुटका मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नॉइस रिडक्शनसाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची मदत घेण्याची गरज नाही.
स्मार्टफोनचे फायदे काय?
कॉलिंग, व्हिडीओ कॉल, डॉक्यूमेंट शेयरिंग, ऑनलाइन पेमेंट, एंटरटेनमेंट इत्यादी
स्मार्टफोनला मराठीत काय म्हणतात?
भ्रमणध्वनी