Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

एक कॉल आणि रिकामं होणार तुमचं बँक अकाऊंट! स्कॅमर्सने लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे. हा स्कॅम असा आहे, जिथे स्कॅमर्सकडून कोणत्या ओटीपीची देखील मागणी केली जात नाही. या स्कॅमबाबत जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2025 | 11:55 AM
OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Follow Us
Close
Follow Us:

स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन पद्धती शोधत असतात. कधी ओटीपी स्कॅम तर कधी तुमच्या व्हाट्सअपवर आमंत्रण पत्रिका येते. आता देखील स्कॅमर्सनी लोकांना फसवण्यासाठी नवीन पद्धत शोधली आहे आणि या पद्धतीमध्ये ओटीपीची देखील गरज भासत नाही. ओटीपीशिवाय स्कॅमर्स तुमचे बँक अकाउंट रिकामं करू शकतात. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये स्कॅमर्स लोकांकडून ओटीपी मागतात आणि लोकांचे बँक अकाउंट रिकामं करतात. मात्र आता असं होणार नाही. तुमचं बँक अकाउंट रिकामं करण्यासाठी ओटीपीची देखील गरज नाही.

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

गेल्या काही दिवसात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये स्कॅमर्सनी ओटीपीशिवाय लोकांची फसवणूक केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घोटाळ्यांबाबत लोकांना सतर्क करण्यासाठी काही सूचना देखील जारी केल्या आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकांना या स्कॅमपासून सावध राहण्यास सांगितले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कॉल मर्जींग स्कॅम काय आहे?

सामान्यतः जेव्हा स्कॅमर्स लोकांची फसवणूक करतात तेव्हा ते लोकांकडून ओटीपीची मागणी करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा ओटीपी मिळवतात. मात्र असं होणार नाही. आता स्कॅमर्सनी अशी पद्धत शोधली आहे ज्यामध्ये लोकांचा कॉल मर्ज केला जातो आणि स्कॅमर्सना ओटीपी सापडतो. या स्कॅमला कॉल मर्जींग स्कॅम असं म्हटलं जातं. यामध्ये ओटीपीशिवाय लोकांची फसवणूक केली जाते. याची सुरुवात मिस्ड कॉलपासून होते.

कॉल मर्ज करताच ओटीपी जाईल

स्कॅमर्स तुम्हाला जॉब इंटरव्यूसाठी किंवा एखाद्या इव्हेंटसाठी कॉल करतात आणि असं सांगतात की तुमचा नंबर तुमच्या मित्राने किंवा एखाद्या नातेवाईकांनी दिला आहे. यानंतर स्कॅमर त्या संबंधित व्यक्तीला कॉल मर्ज करण्यास सांगतात, त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की खरंच आपल्या एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने हा नंबर दिला आहे आणि समोर तोच फक्त बोलत आहे. पण खरंतर समोर क्रेडिट कार्ड कंपनी किंवा एखादी बँक कंपनी असते जिथे तुमचा ओटीपी दिला जातो. स्कॅमर्सने सांगितल्याप्रमाणे जसं तुम्ही कॉल मर्ज करता त्याचवेळी तुमचा ओटीपी स्कॅमरकडे जातो. यामुळेच स्कॅमर्स अगदी सहज तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढू शकतात.

चीनचं नक्की चाललंय तरी काय? वर्षभरात तयार करणार ‘प्रेग्नेंट रोबोट’! मिनी रोबोट्सना नाही तर चक्क माणसांनाच देणार जन्म…

अशा परिस्थितीत काय करावं?

हा स्कॅम अत्यंत धोकादायक आहे. यापासून कसं वाचावे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करून सामान्य माणसं स्कॅमर्सपासून आपली सुरक्षा करू शकतात. कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल किंवा मेसेज आला तर त्याकडे लक्ष देऊ नका. जर एखाद्या नंबरवरून कॉल करून तुमच्याकडे ओटीपीची मागणी केली जात असेल तर फोन लगेच कट करा आणि नंबर ब्लॉक करा. तुमच्यासोबत एखादी फ्रॉईडची घटना घडली तर तात्काळ पोलिसात किंवा तुमच्या जवळील सायबर क्राईममध्ये तक्रार करा. तसेच जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुमच्या फोनमध्ये स्कॅम डिटेक्शन फीचर ऑन करा. यामुळे अनोळखी नंबरवरून येणारे कॉल प्रचंड कमी होतील आणि तुमची सुरक्षा टिकून राहील.

Web Title: Call merge is the new scam method by which scammers will empty your bank account tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • fraud
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.