Aadhaar Card Tips: तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम... दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान
आधार संबंधित ओटीपी सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असतो. यामुळेच UIDAI ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तुमचा ओटीपी कोणत्याही व्यक्तिसोबत शेअर करू नका. बँक कर्मचारी किंवा कोणताही अधिकारी तुमच्याकडे ओटीपीची मागणी करत नाहीत. ओटीपीशिवाय कोणतीही व्यक्ती तुमच्या आधार अकाऊंटपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे नेहमी तुमचा ओटीपी सुरक्षित ठेवा. (फोटो सौजन्य – AI Created)
तुम्ही UIDAI ची वेबसाईट किंवा आधार अॅपवरून तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक करू शकता. असं केल्यानंतर कोणतीही व्यक्ती तुमच्या फिंगरप्रिंट, डोळ्यांची ओळख किंवा फेस डेटाचा चुकीचा वापर करू शकणार नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही स्वत: ही माहिती अनलॉक करू शकता.
सोशल मीडिया किंवा कोणत्याही पब्लिक वेबसाईटवर आधार कार्डचा फोटो शेअर करू नका. ऑनलाइन प्लेटफॉर्मवर शेअर करण्यात माहिती हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगार अगदी सहज कॉपी करू शकतात आणि याचा चुकीचा वापर देखील केला जाऊ शकतो ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
जिथे तुम्हाला ओळखपत्रासाठी आधार कार्ड द्यावा लागते, तिथे पूर्ण आधार कार्ड देण्यापेक्षा ‘मास्क्ड आधार’ चा वापर करा. यामध्ये आधारचे पहिले 8 नंबर लपलेले असतात आणि केवळ शेवटचे 4 अंक दिसतात.
जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आधारचा चुकीचा वापर केला जात आहे किंवा तुम्ही सायबर गुन्हेगारीचे शिकार होत आहात तर तुम्ही कारवाई करू शकता. सायबर क्राईमवर तक्रार दाखल करण्यासाठी 1930 वर कॉल करा आणि आधार संबंधित मदतीसाठी UIDAI हेल्पलाइन 1947 वर संपर्क करा.
Ans: आधार कार्ड बंधनकारक नाही, पण सरकारी योजना, सबसिडी, बँक व KYC साठी ते मोठ्या प्रमाणात आवश्यक ठरते.
Ans: नाव, जन्मतारीख/वय, लिंग, पत्ता, फोटो, बायोमेट्रिक माहिती आणि 12 अंकी आधार क्रमांक असतो.
Ans: होय. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि फोटो UIDAI केंद्र किंवा ऑनलाइन अपडेट करता येतो.






