Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात आपण ऑफीसला किंवा बाहेर फिरायला जातो. अशावेळी पावसाळ्यात आपल्या स्मार्टफोनची काळजी कशी घ्यावी, याबाबत अनेकांना माहिती नसते. आपण पावसात भिजल्यानंतर ओल्या हातांनी आपल्या स्मार्टफोनचा वापर करतो. मात्र या घटना धोकादायक ठरू शकतात. कारण ओल्या हातांनी स्मार्टफोनचा वापर केल्यास ब्लास्ट होण्याची देखील शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पावसळ्यात तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेऊ शकता.
तुमच्या स्मार्टफोनला पावसात सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या क्विलिटीचा वाटरप्रूफ मोबाइल पाउच खरेदी करा. किंवा एखादी झिपलॉक बॅग खरेदी करा. यामुळे तुम्ही पावसळ्यात तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा करू शकता.
पाणी आणि वीजेचा एकत्र वापर केल्यास अनर्थ घडू शकतो. त्यामुळे ओल्या हातांनी स्मार्टफोनचा वापर करू नका. तसेच स्मार्टफोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये पाणी जाणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे शॉर्ट सर्किट होऊन तुमचा स्मार्टफोन खराब होऊ शकतो. तसेच युजरला करंट लागण्याचा धोका देखील असतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
पावसाळ्यात बॅकग्राऊंटड अॅप्स अधिक अॅक्टिव्ह असतात, ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. अशा परिस्थितीत तुमच्या स्मार्टफोनमधील बॅटरी सेव्हर ऑन करा, ज्यामुळे तुम्ही दिर्घकाळासाठी तुमच्या स्मार्टफोनचा वापर करू शकणार आहात.
Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास किंवा स्मार्टफोन ओला झाल्यास तो तात्काळ बंद करा. स्मार्टफोन कोरडा करण्यााठी चुकूनही हेअर ड्रायरचा वापर करू नका. याऐवजी तुमचा स्मार्टफोन एका कोरड्या कापडाने पुसा आणि त्याला सिलिका जेल पॅकेटमध्ये २४ तासांसाठी ठेवा.
पावसाळ्या स्मार्टफोन ओला झाल्याने किंवा चार्जिंग पोर्टमध्ये पाणी गेल्याने तो खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमचे संपर्क, फोटो, व्हॉट्सअॅप चॅट आणि महत्त्वाचे कागदपत्रे गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लॉडमध्ये बॅकअप घेत रहा. तसेच, वेळोवेळी तुमच्या लॅपटॉपवर डेटा ट्रान्सफर करत रहा.
तुमचा फोन बॅगेत ठेवताना त्याच्यासोबत सिलिका जेलचे पॅकेट ठेवा किंवा फोना प्लास्टिक पेपरमध्ये गुंडाळा. यामुळे फोनमध्ये पाणी जाणार नाही.
जर तुम्ही बाईक किंवा स्कूटीने प्रवास करत असाल तर IP68 रेटेड किंवा मिलिटरी-ग्रेड कव्हर वापरण्याची खात्री करा. हे फोनला पाणी आणि शॉकपासून वाचवते.
पावसाळ्यात धूळ आणि पाण्यामुळे स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट खराब होऊ शकतो. त्यामुळे ठरावीक दिवसांनी सॉफ्ट ब्रश किंवा ब्लोअरने तुमच्या स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट साफ करा.
तुमचा फोन वॉटर-रेझिस्टंट असला तरीही, जर पावसाचे पाणी इअरपीस किंवा मायक्रोफोनमध्ये गेले तर फोन खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, कॉल करण्यासाठी वायर्ड इअरफोन किंवा ब्लूटूथ बड वापरा.