Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Smart TV अपडेट करावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ? कसा होतो फायदा? जाणून घ्या

स्मार्ट टीव्ही अपडेट केल्यानंतर तुमच्या टीव्हीचा परफॉर्मन्स सुधारेल. याशिवाय नवीन सुविधा देखील जोडल्या जातील. ज्यामुळे तुम्हाला टीव्ही बघताना अधिक चांगला अनुभव मिळेल. त्यामुळे स्मार्ट टीव्ही अपडेट करणे गरजेचे आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2025 | 07:45 PM
Tech Tips: Smart TV अपडेट करावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ? कसा होतो फायदा? जाणून घ्या

Tech Tips: Smart TV अपडेट करावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ? कसा होतो फायदा? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळात स्मार्ट टीव्ही लोकांची गरज बनली आहे. सेट टॉप बॉक्स किंवा डिश टीव्ही वापरण्यापेक्षा स्मार्ट टीव्हीसाठी लोक वाय-फायचा वापर करण्याला प्राधान्य देतात. याचे अनेक फायदे देखील मिळतात. शिवाय पैशांची देखील बचत होते. जर तुम्ही सेट टॉप बॉक्सचा वापर करत असाल तर तुम्हाला दर महिन्याला काही ठराविक पैसे खर्च करावे लागतात आणि या पैशांमध्ये केवळ तुमच्या टीव्हीचा खर्च भागतो. पण जर वायफायचा विचार केला तर तुम्ही एका वायफाय रिचार्जवर स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप वापरू शकता.

तुम्ही कुठे आहात, काय करताय… काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?

स्मार्ट टीव्हीवर तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या वेळी तुमची आवडते कार्यक्रम सिरीयल आणि शो बघू शकता. याशिवाय टीव्हीवर तुम्ही व्हिडिओ किंवा मोबाईल कनेक्ट करून गेम देखील खेळू शकता. त्यामुळे तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर गेम खेळण्याचा आनंद घेता येईल. सध्याच्या काळात स्मार्ट टीव्ही एक मल्टी फीचर डिवाइस बनले आहे. हे एक असं डिवाइस आहे की ते इंटरनेटच्या मदतीने अनेक सुविधा प्रदान करते. पण ज्याप्रमाणे आपला स्मार्टफोन लॅपटॉप आणि इतर डिवाइस अपडेट केले जातात त्याचप्रमाणे स्मार्ट टीव्ही अपडेट करणे देखील गरजेचे आहे. का याबाबत अनेक लोकांना माहिती नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आपण दिवसभर स्मार्ट टीव्हीचा वापर करतो. काही वेळा स्मार्ट टीव्ही हँग होतो किंवा स्लो चालतो आणि अशावेळी काय करावे अनेकांना सुचत नाही. यावरील उपाय म्हणजे तुमच्या स्मार्ट टीव्ही वेळोवेळी अपडेट करणे. असे अनेक लोक असतात की त्यांचा स्मार्टफोन आणि लॅपटॉप वेळोवेळी अपडेट करतात. हे स्मार्ट टीव्हीच्या अपडेटकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतं. स्मार्ट टीव्ही अपडेट करण्याची अनेक फायदे आहेत. तशीच ही प्रोसेस देखील अगदी सोपी आहे. त्यामुळे तुम्ही अगदी काही क्षणात तुमचा स्मार्ट टीव्ही अपडेट करू शकता.

जसं जसं तंत्रज्ञान बदलत आहे अशाच कंपन्या देखील त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक बदल करत आहेत. ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा हाच त्यामागील उद्देश आहे. मात्र जर तुम्ही या सर्वाकडे दुर्लक्ष करून तुमचा स्मार्ट टीव्ही वेळोवेळी अपडेट करत नसाल तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं. याशिवाय तुमचा टीव्ही लवकर खराब होण्याची शक्यता देखील निर्माण होते. कंपनीने जारी केलेल्या प्रत्येक अपडेटमध्ये काही ना काही बग्स फिक्स केले जातात आणि टीव्हीचा स्पीड देखील वाढवला जातो. ज्यामुळे तुमचा टीव्ही पूर्वीपेक्षा स्मूद आणि लॅग फ्री अनुभव देतो.

इंटरनेटद्वारे कनेक्ट केले जाणारे डिवाइस सहसा सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमचं स्मार्ट टीव्ही देखील डेटा चोरीच्या विळख्यात अडकू शकतो. कंपनीने जापी केलेले नवे अपडेट स्मार्ट टीव्हीची सुरक्षा वाढवतो आणि या डिवाइसची सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करते. अनेकदा नवीन फीचर जोडण्यासाठी कंपनी सॉफ्टवेअर अपडेट जारी करत असते. नवीन स्ट्रीमिंग अ‍ॅप्स, चांगले युजर इंटरफेस, स्क्रीन मिररिंगमध्ये सुधारणा, या सर्वामुळे युजरचा अनुभव अधिक चांगला होतो. अशा परिस्थितीत नवीन टीव्ही खरेदी न करता हे तुम्ही जुन्या टीव्हीमध्ये नवीन फीचरचा अनुभव घेऊ शकता.

स्वस्तात मस्त! ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही… Flipkart ची ग्राहकांना खास भेट, लवकरच सुरु होणार Freedom Sale 2025

नेटफ्लिक्स, यूट्यूब, अमेझॉन प्राइम सारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेळोवेळी त्यांचे अ‍ॅप्स अपडेट करतात. जर तुमचा स्मार्ट टीव्ही जुने सॉफ्टवेअर वापरत असेल तरी काही ॲप्स योग्य विचार काम करत नाही. अशावेळी सॉफ्टवेअर अपडेट अत्यंत महत्त्वाचे ठरते. जुन्या टीव्ही सॉफ्टवेअरमुळे अनेकदा किरकोळ समस्या उद्भवतात, जसे की टीव्ही अचानक बंद होणे, वाय-फाय डिस्कनेक्ट होणे किंवा रिमोट योग्यरित्या काम करत नाही. या समस्या सॉफ्टवेअर अपडेटने दुरुस्त केल्या जाऊ शकतात.

  • तुम्हाला तुमचा स्मार्ट टीव्ही अपडेट करायचा असेल तर तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावे लागणार आहे
  • सर्वात आधी तुमचा स्मार्ट टीव्ही वाय-फायशी कनेक्ट करा.
  • टीव्हीची सेटिंग्ज ओपन करा आणि ‘सॉफ्टवेअर अपडेट’ किंवा ‘सिस्टम अपडेट’ पर्याय निवडा.
  • सेटिंग मध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या टीव्हीसाठी नवीन अपडेट्स उपलब्ध आहेत की नाही.
  • जर नवीन अपडेट उपलब्ध असेल तर ते डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
  • अपडेट पूर्ण झाल्यानंतर, टीव्ही रीस्टार्ट करा जेणेकरून सर्व बदल लागू केले होतील.

Web Title: How to update your smart tv know the whole process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • smart TV
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्
1

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
2

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत
3

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज
4

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.