स्वस्तात मस्त! ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही... Flipkart ची ग्राहकांना खास भेट, लवकरच सुरु होणार Freedom Sale 2025
Flipkart Upcoming Sale: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने अलीकडेच आगामी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Amazon नंतर आता ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart ने देखील 2025 मधील आणखी एका मोठ्या सेलची घोषणा केली आहे. हा सेल येत्या काही दिवसांतच सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंग करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Flipkart Freedom Sale 2025 सेल ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. शुक्रवारी या सेलची घोषणा करण्यात आली आहे. Flipkart Freedom Sale 2025 सेलदरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन्स, लॅपटॉपसह वेगवेगळ्या प्रोडक्ट्सटच्या खरेदीवर बँक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय फ्लिपकार्ट प्लस मेमंबर्सना सेलचा अर्ली अॅक्सेस दिला जाणार आहे. याशिवाय कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, ग्राहकांना या सेलमध्ये 78 ‘फ्रीडम डील्स’, ‘रश ऑवर्स’, एक्सचेंज ऑफर्स आणि ‘बंपर ऑवर्स’ सारख्या डिल्सचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्राहक अगदी कमी किंमतीत इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायंसेजची खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Flipkart मोबाइल अॅपमधील माहितीनुसार, Freedom Sale 2025 हा 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हा सेल 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. Amazon ग्रेट फ्रीडम सेल 2025 देखील 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही सेल जर 1 ऑगस्टपासून सुरु झाल्यास ग्राहकांना बराच फायदा होणार आहे. दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्सने सेल कधी सुरु होणार आहे, याची तारीख जाहिर केली असली तरी देखील हा सेल कधी संपणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.
1 ऑगस्ट की 2 ऑगस्ट याबाबत ग्राहकांमध्ये गोंधळ आहे. मात्र Flipkart Freedom Sale 2025 ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुरु होणार आहे, याबाबत माहिती समोर आली आहे. Flipkart Plus आणि VIP ग्राहकांना सेल सुरु होण्याच्या 24 तास आधीच अॅक्सेस मिळणार आहे. त्यामुळे Flipkart Plus आणि VIP युजर्स बंपर ऑफर्सचा फायदा घेऊ शकणार आहेत. याचा अर्थ असा की सामान्य युजर्सच्या आधी Flipkart Plus आणि VIP युजर्स सर्व ऑफरचा लाभ घेऊ शकतील. सेलदरम्यान Flipkart बँक ऑफर्स अंतर्गत, 15 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय, Flipkart Plus मेंबर्सनी Super Coins चा वापर केल्यास 10% अतिरिक्त डिस्काऊंट दिलं जाणार आहे.
Tech Tips: तुम्ही खरेदी केलेला सेकंड हॅण्ड Smartphone चोरीचा तर नाही ना? एक SMS आणि समोर येईल सत्य
Freedom Sale 2025 अंतर्गत Flipkart एकूण 78 ‘फ्रीडम डील्स’, एक्सचेंज ऑफर्स, ‘रश ऑवर्स’, ‘टिक टॉक’ आणि ‘बंपर ऑवर्स’ सादर करणार आहे. या डिल्सबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र ग्राहक मोबाईल, गॅजेट्स, होम अप्लायंसेज, ब्यूटी आणि हेल्थ सारख्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर्सचा फायदा घेऊ शकणार आहेत.