Tech Tips: कंटेंट AI ने लिहिला आहे की माणसाने? व्हेरिफाय करण्याची प्रोसेस आहे अगदी सोपी, फक्त वापरा या Smart Tricks
आजच्या काळात लोकं स्वतः मेहनत करून कंटेंट लिहिण्यापेक्षा AI ची मदत घेतात. ChatGPT सारख्या AI टूल्स च्या मदतीने तुम्ही कोणत्याही विषयावरील माहिती शोधू शकता. विशेषतः शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी या AI टूल्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ज्यामुळे त्यांना एक प्रोफेशनल आणि चांगला कंटेंट मिळतो. पण यामुळे एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. कंटेंट AI ने लिहिला आहे की त्या व्यक्तीने, हे समजणं फार कठीण आहे. सध्या ही समस्या शाळा, कॉलेज आणि अनेक कपन्यांमध्ये आहे.
जर कोणी तुम्हाला ChatGPT ने लिहिलेला कंटेंट शेअर केला, तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, कंटेंट AI ने लिहिला आहे की माणसानं, हे कसं ओळखावं? ही समस्या AI ने निर्माण केली असली त्याचे उत्तर देखील AI च देते. तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून AI ने लिहिलेला कंटेंट व्हेरिफाय करू शकता. सध्या असे अनेक टूल्स उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने आपण अगदी सहज ओळखू शकतो की कंटेंट AI ने लिहिला आहे की माणसाने. Originality.ai, GPTZero, Copyleaks AI Content Detector, Sapling AI Detector आणि Writer.com सारखे AI टूल्स टेक्स्टचे विश्लेषन करतात आणि माहिती देतात की कंटेंट AI ने लिहिला आहे की नाही. या टूल्समध्ये तुम्हाला कंटेंट केवळ पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंटेंटबद्दल माहिती दिली जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॅटजीपीटी फाउंडर सॅम ऑल्टमॅनने स्वत:ला सांगितलं आहे की, AI भ्रम निर्माण करतो. म्हणजेच अनेकदा AI चुकीची माहिती सादर करतो आणि त्याचा अर्थ बदलतो. यामुळे, AI ने गोळा केलेल्या तथ्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत, जर कोणत्याही अहवालात, संशोधनात किंवा वेबसाइटमध्ये सांगितलं असेल की संबंधित माहिती AI ने दिली आहे, तर इंटरनेटवर क्रॉस चेक करा आणि ती माहिती किती बरोबर आहे ते पहा.
फॅक्ट करण्याव्यतिरिक्त प्लेजरिज्म तपासणं देखील तितकंच गरजेचं आहे. सहसा, AI कंटेंट ओरिजिनल असतो, मात्र काहीवेळा इंटरनेटवर उपलब्ध असलेला कंटेट AI मध्ये कॉपी केला जातो. तुम्ही प्लेजरिज्म तापसण्यासाठी Grammarly, Quetext आणि Turnitin सारख्या टूल्सची मदत घेऊ शकता.
आजच्या डिजीटल काळात सर्वांसाठी AI एक चांगला साथीदार बनला आहे. त्यामुळे अनेक लोकं AI ने दिलेल्या माहितीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र या माहितीत सत्य आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा विषय शिक्षण, रिसर्च किंवा प्रोफेशनलिज्मसंबंधित असेल तेव्हा सत्य आणि विश्वासार्हता अत्यंत गरेजची आहे. म्हणून, जर तुम्हाला शंका असेल की कोणताही मजकूर ChatGPT किंवा कोणत्याही AI द्वारे लिहिलेला आहे, तर वर नमूद केलेल्या पद्धती वापरून त्याची सत्यता जाणून घेणे खूप सोपे आहे.