
तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट
दिल्लीसह भारतातील अनेक शहरांत प्रदूषण वाढलं आहे. वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याच सर्व गोष्टींचा विचार करून आता गुगल मॅप्सने त्यांच्या युजर्ससाठी एक खास रियल-टाइम AQI ट्रॅकर लाँच केलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या शहरातील रियल-टाइम AQI ट्रॅक करू शकणार आहेत. गुगल मॅप्समधील या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या शहरातील हवेची गुणवत्ता तपासू शकणार आहेत आणि त्यांची दिनचर्या ठरवू शकणार आहेत. गुगल मॅप्समध्ये जारी करण्यात आलेले हे नवीन अपडेट जगातील 40 हून अधिक देशांचा प्रदूषण डेटा प्रत्येक तासाला अपडेट करत असतो. या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे.
यापूर्वी नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म गुगल मॅप्सववर AQI डेटा थोड्या वेळाने दिसत होता, मात्र आता युजर्सना गुगल मॅप्सवर शहरातील AQI ची लाईव्ह रिडींग पाहायला मिळणार आहे. यूजर्स बाहेर जाण्यापूर्वी, वर्कआऊट करण्यापूर्वी किंवा फिरायला जाण्यापूर्वी त्यांच्या शहरातील हवेची स्थिती पाहू शकतात. गुल मॅप्सने जारी केलेले हे नवीन फीचर अशा शहरांत मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे, जिथे प्रदूषण वेगाने वाढते किंवा कमी होतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
यूजर्सना त्यांच्या शहरातील एयर क्वालिटी-अगदी समजावी यासाठी Google Maps ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रंगांचा AQI स्केल समाविष्ट केला आहे. प्रत्येक तासाला अपडेट होणारे हे आकडे अॅप आणि डेस्कटॉप दोन्हीवर पाहायला मिळणार आहेत. AQI स्केल 0 ते 500 पर्यंत चालणार आहे. या ठिकाणी तुमच्या शहरातील AQI चा नंबर स्केलवर जितका कमी असेल, याचा अर्थ तुमच्या शहरात तितकी जास्त साफ हवा आहे.
गुगल मॅपवरील स्केलवर दिसणाऱ्या या रंगांच्या मदतीने युजर्स अगदी सहज समजू शकतात की त्यांच्या शहरातील AQI किती आहे आणि अशा परिस्थितीत बाहेर जाणं सुरक्षित आहे की नाही.
हे रिअल-टाइम AQI फीचर लोकांना त्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेण्यास मदत करेल, विशेषतः हिवाळ्यात आणि जास्त प्रदूषित दिवसांमध्ये हे फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
Ans: Google Maps हे नेव्हिगेशन अॅप आहे जे स्थळे शोधणे, मार्ग दाखवणे, ट्रॅफिक माहिती, बिझनेस लोकेशन इत्यादी सुविधा देते.
Ans: होय. Google Maps पूर्णपणे मोफत वापरता येते.
Ans: होय. आपण Offline Maps डाउनलोड करून इंटरनेटशिवायही वापरू शकता.