BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या युजर्ससाठी एक खास प्लॅन सादर केला आहे. कंपनीने हा प्लॅन खास प्रीपेड युजर्ससाठी लाँच केला आहे. कंपनीच्या या नवीन रिचार्ज प्लॅनचं नाव सिल्वर जुबली प्लॅन असं ठेवलं आहे. यामध्ये काही खास फायदे देण्यात आले आहेत. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनची किंमत 300 रुपयांहून कमी आहे आणि या प्लॅनमध्ये तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. म्हणजेच अत्यंत कमी किंमतीत युजर्सना एका महिन्याच्या व्हॅलिडीटीसह इतर अनेक फायदे देखील मिळणार आहेत.
सरकारी टेलिकॉम सर्विस प्रोवाइडर (TSP) ने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये नवीन रिचार्ज प्लॅन आणि त्यामध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती देण्यात आली. या लिमिटेड-टाइम प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. कंपनीने लाँच केलेला नवीन सिल्वर जुबली प्लॅन त्यांच्या युजर्सना 2.5GB डेली मोबाइल डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि एसएमएस बेनिफिट्स अत्यंत कमी किंमतीत ऑफर केले जातात. ही ऑफर कंपनीच्या आधीपासूनच जाहीर करण्यात आलेल्या Silver Jubilee FTTH प्लॅनला जॉईन करणार आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
A special plan for a special milestone! Celebrate 25 years of BSNL with the ₹225 Silver Jubilee Plan. Unlimited Calls | 2.5GB/Day | 100 SMS/Day | 30 Days Validity 🔗 Recharge Here https://t.co/yDeFrwK5vt#SwitchToBSNL #BSNL #PrepaidPlan #SilverJubileeCelebration pic.twitter.com/Hg6HQcGteG — BSNL India (@BSNLCorporate) November 13, 2025
BSNL ने दिलेल्या माहितीनुसार, Silver Jubilee प्लॅनची किंमत 225 रुपये आहे आणि कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या 30 दिवसांत युजर्सना रोज 2.5GB 4G डेटा, अनलिमिटेड लोकल आणि STD व्हॉईस कॉल्स आणि रोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. फेयर यूसेज पॉलिसी (FUP) अंतर्गत, डेली डेटा संपल्यानंतर स्पीड 40kbps पर्यंत कमी होते.
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी युजर्सना BSNL चे वेब पोर्टल किंवा BSNL Self Care अॅपवर जाऊन रिचार्ज करावा लागणार आहे. नवीन युजर्स रिटेलर किंवा BSNL कॉमन सर्विसेज सेंटरला भेट देऊन या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. ही केंद्रे असे पॉइंट्स आहेत जिथून टेलिकॉम ऑपरेटर सिम कार्ड जारी करणे, बिल भरणे आणि मोबाईल रिचार्ज यासारख्या सार्वजनिक उपयुक्तता सेवा प्रदान करतात.
BSNL ने अलीकडेच Silver Jubilee FTTH प्लॅन देखील सादर केला होता. या प्लॅनची किंमत 625 रुपये प्रति महिना आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 70Mbps स्पीडसह 2500GB हाय-स्पीड डेटा आणि यासोबतच एंटरटेनमेंट बेनिफिट्स देखील ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये युजर्सना 600 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स, ज्यामध्ये 127 प्रीमियम चॅनलचा समावेश आहे, अशा सर्वांचा एक्सेस मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये JioHotstar आणि SonyLIV OTT प्लेटफॉर्म प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते.






