Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रेडिट कार्डपासून आधार डिटेल्सपर्यंत चोरीला जाऊ शकते तुमची सर्व माहिती; आत्ताच डिलीट करा स्मार्टफोनमधील धोकादायक Apps

Dangerous Smartphone Apps: आज जवळजवळ प्रत्येक काम स्मार्टफोन आणि त्यात असलेल्या अ‍ॅप्सद्वारे केले जात आहे. यामुळे अनेक लोकांची कामे सोपी झाली आहेत. परंतु या सुविधेशी अनेक गंभीर धोके देखील वाढले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 10:23 AM
क्रेडिट कार्डपासून आधार डिटेल्सपर्यंत चोरीला जाऊ शकते तुमची सर्व माहिती; आत्ताच डिलीट करा स्मार्टफोनमधील धोकादायक Apps

क्रेडिट कार्डपासून आधार डिटेल्सपर्यंत चोरीला जाऊ शकते तुमची सर्व माहिती; आत्ताच डिलीट करा स्मार्टफोनमधील धोकादायक Apps

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या डिजीटल युगात आपली सर्व कामं स्मार्टफोनद्वारे केली जातात. आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक नवीन अ‍ॅप्स देखील डाऊनलोड करतो. हे स्मार्टफोन अ‍ॅप्स आपल्याला आपल्या अनेक कामांसाठी फायदेशीर ठरतात. जसं की ऑनलाईन व्यवहार किंवा चॅटिंग आणि कॉलिंग. प्ले स्टोअरवर डेव्हलपर्सनी तयार केलेले लाखो अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यातील काही अ‍ॅप्स त्यांच्या युजर्सनी फ्री सर्विस देतात, तर काही अ‍ॅप्स प्रिमियम मेंमबर्ससाठी तयार केले जातात.

ठरलं तर मग! Vivo X200s या स्मार्टफोनसोबत करणार एंट्री, स्क्रीनवर मिळणार Dynamic Island फीचर आणि बरंच काही

स्मार्टफोन अ‍ॅप्स म्हटलं तर केवळ फ्री आणि प्रिमियम एवढचं नसतं. तर हे अ‍ॅप्स खरे आहेत की फ्रॉड, हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये एखादा अ‍ॅप डाऊनलोड केला आणि तो अ‍ॅप फ्रॉड असेल तर आपली संपूर्ण माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते आणि आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे असे अ‍ॅप्स आपल्या स्मार्टफोनमधून डिलीट करणं फार गरजेचं आहे. पण आपल्या स्मार्टफोननधील फ्रॉड अ‍ॅप्स ओळखाचे कसे, हा प्रश्न आलाच. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील फ्रॉड अ‍ॅप्स ओळखू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

बनावट अ‍ॅप्स मूळ प्लॅटफॉर्मची कॉपी करतात

बनावट आणि फ्रॉड अ‍ॅप्स लोकांना बक्षिसे ऑफर करतात, या बक्षीसांसाठी ते लोकांना क्रेडिट कार्डची माहिती नोंद करण्यास भाग पाडतात. हे मालवेअर तुमचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरण्यासाठी डिझाइन केलेले असतात. बनावट अ‍ॅप्स मूळ प्लॅटफॉर्मची कॉपी करतात. नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अ‍ॅनालिसिस युनिट (NCTAU) च्या अलीकडील अहवालांमधून असे दिसून आले आहे की हे अ‍ॅप्स कॉल इंटरसेप्ट करू शकतात, एसएमएस डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात आणि पॅन नंबर, आधार तपशील आणि बँकिंग क्रेडेन्शियल्स यासारखी वैयक्तिक माहिती चोरू शकतात. त्यामुळे असे अ‍ॅप्स स्मार्टफोनमधून डिलीट करणं गरजेच आहे.

बनावट अ‍ॅप्स कसे काम करतात?

  • बनावट अ‍ॅप्स अनेकदा युजर्सना आकर्षित करण्यासाठी रिवॉर्ड पॉइंट रिडेम्पशन सारख्या आकर्षक ऑफर देतात. एकदा डाउनलोड केल्यानंतर, ते युजर्सना क्रेडिट कार्ड तपशीलांसारखी संवेदनशील माहिती प्रविष्ट करण्यास सांगतात.
  • हे अ‍ॅप्स खऱ्या सेवांच्या डिझाइन आणि इंटरफेसची नक्कल करतात, ज्यामुळे युजर्सना फसवणे सोपे होते. अधिकृत लोगो, ब्रँडिंग आणि वैशिष्ट्यांची नक्कल करते.
  • हे अ‍ॅप्स युजर्सना आधार, पॅन कार्ड इत्यादी अपलोड करण्यास सांगतात ज्यामुळे ओळख चोरी आणि आर्थिक फसवणूक होण्याचा धोका वाढतो.
  • इंस्टॉलेशन दरम्यान, हे अ‍ॅप्स एसएमएस आणि कॉल लॉग अ‍ॅक्सेस, कॉन्टॅक्ट आणि लोकेशन डेटा, कॅमेरा आणि मायक्रोफोन सारख्या अनावश्यक परवानग्या मागतात.
  • एकदा इन्स्टॉल केल्यानंतर, हे अ‍ॅप्स फोनची आवश्यक वैशिष्ट्ये हायजॅक करू शकतात. यामध्ये OTP रोखण्यासाठी डीफॉल्ट SMS अ‍ॅप बदलणे समाविष्ट आहे. यामध्ये कॉल फॉरवर्डिंग सेटिंग्ज बदलून दुसऱ्या नंबरवर कॉल रीडायरेक्ट करणे समाविष्ट आहे.
केवळ 6 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Redmi A5; 5200mAh बॅटरीसह मिळणार हे स्पेशल फीचर्स

बनावट अ‍ॅप्स कसे ओळखावेत

  • जर एखाद्या अ‍ॅपने एसएमएस, कॉल लॉग किंवा बँकिंग डेटाची परवानगी मागितली तर सावधगिरी बाळगा.
  • थर्ड पार्टी स्टोअर्स किंवा अज्ञात लिंक्सवरून अ‍ॅप्स डाउनलोड करू नका.
  • अत्यंत असामान्य किंवा खूप आकर्षक वाटणाऱ्या ऑफर बहुतेकदा घोटाळे असतात.
  • जर एखाद्या अ‍ॅपने तुमचे डीफॉल्ट एसएमएस किंवा कॉल सेटिंग्ज बदलले तर ते त्वरित डिलीट करा.
  • फक्त अधिकृत स्त्रोतांकडूनच अ‍ॅप्स डाउनलोड करा. नेहमी गुगल प्ले स्टोअर वापरा.
  • फोनची ऑपरेटिंग सिस्टम आणि अ‍ॅप्स अपडेट करा. यामुळे सायबर धोका कमी होतो.
  • तुमचे बँक व्यवहार नियमितपणे तपासत राहा आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास ताबडतोब बँकेला कळवा.

Web Title: How yo recognize dangerous apps from your smartphone know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…
1

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
2

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
3

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
4

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.