केवळ 6 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Redmi A5; 5200mAh बॅटरीसह मिळणार हे स्पेशल फीचर्स
स्मार्टफोन कंपनी Redmi ने त्यांचा नवीन स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Redmi A5 या नावाने लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 चिपसेट आणि 5,200mAh बॅटरी दिली आहे. हा फोन Android 15 Go Edition वर चालतो आणि त्यात 3.5 मिमी ऑडिओ जॅक आहे.
या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. यात 6.88-इंचाचा डिस्प्ले आहे, जो ट्रिपल TÜV राईनलँड आय-प्रोटेक्शन सर्टिफिकेशनसह येतो आणि सुरक्षेसाठी बाजूला माउंट केलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. भारतासह निवडक बाजारपेठांमध्ये हा हँडसेट Poco C71 म्हणून लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे हा नवीन स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार आणि त्याची भारतातील किंमत काय असणार याबाबत माहिती नाही. (फोटो सौजन्य –Redmi)
इंडोनेशियामध्ये Redmi A5 स्मार्टफोन 4GB + 128GB या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Redmi A5 च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत IDR 11,99,000 म्हणजेच अंदाजे 6,100 रुपये ठेवण्यात आली आहे. हे देशात शाओमी ई-स्टोअर आणि निवडक ऑनलाइन रिटेलर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा हँडसेट लेक ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि सँडी गोल्ड रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Redmi A5 मध्ये 6.88-इंचाचा एचडी+ (720×1,640 पिक्सेल) डिस्प्ले आहे जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि ट्रिपल टीयूव्ही राइनलँड आय-प्रोटेक्शन सर्टिफिकेशन (लो ब्लू लाइट, फ्लिकर-फ्री आणि सर्केडियन) सह येतो. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन स्क्रीन वेट टच तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. ज्यामुळे तुम्ही ओल्या हातांनी देखील तुमच्या स्मार्टफोनचा वापर करू शकता.
Xiaomi ने पुष्टी केली आहे की Redmi A5 मध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 चिपसेट आहे, जो 4GB LPDDR4X रॅम आणि 128GB eMMC 5.1 ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. हे 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम एक्सपँशनला देखील समर्थन देते. हा फोन Android 15 Go Edition सह येतो. कंपनीचा दावा आहे की 36 महिन्यांच्या नियमित वापरानंतरही ते ‘नवीन युजर्ससारखा अनुभव’ देईल.
फोटोग्राफीसाठी, Redmi A5 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा युनिट आहे ज्यामध्ये 32-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर (f/2.0 अपर्चर) आणि एक अनिर्दिष्ट सेकंडरी सेन्सर आहे. फ्रंट कॅमेऱ्यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.
Redmi A5 मध्ये 5,200mAh बॅटरी आहे, जी 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि एआय-बॅक्ड फेस अनलॉक फीचर आहे.
कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय, FM रेडिओ, ब्लूटूथ 5.2, GPS, GLONASS, गॅलिलिओ, BDS (फक्त B1C), USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक यांचा समावेश आहे. त्याचा आकार 171.7 x 77.8 x 8.26mm आणि वजन 193 ग्रॅम आहे.