
फोटो सौजन्य - Social Media
HP Inc. ने भारतात कामाच्या भविष्यासाठी २० हून अधिक नवीन उत्पादने आणि सोल्यूशन्सचे अनावरण केले आहे. या नव्या पोर्टफोलिओमध्ये एआयवर आधारित पीसी, टॅब्लेट, प्रिंटिंग सोल्यूशन्स आणि हायब्रिड कार्यपद्धतीसाठी अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. कंपनीने भारतात प्रथमच HP OmniPad 12 सादर केला असून तो टॅब्लेटची लवचिकता आणि पीसीसारखी उत्पादकता देणारा डिव्हाइस आहे. तसेच HP EliteBoard G1a हा जगातील पहिला एआय कीबोर्ड पीसीदेखील लॉन्च करण्यात आला आहे.
एचपीच्या नव्या लाइनअपमध्ये एआय-सक्षम HP EliteBook, HP ProBook आणि HP OmniBook सिरीजचा समावेश आहे. या उपकरणांमध्ये प्रगत एआय क्षमता, सुरक्षितता आणि हायब्रीड कामासाठी स्मार्ट सहयोगी फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने एचपी आयक्यू आणि निअरसेन्ससारखी ऑन-डिव्हाइस एआय सोल्यूशन्सही सादर केली आहेत, ज्यामुळे दस्तऐवज विश्लेषण, मीटिंग नोट्स आणि डिव्हाइस कनेक्टिव्हिटी अधिक सोपी होणार आहे.
याशिवाय, एचपीने HP Z Workstations आणि एआय वर्कलोडसाठी नवीन वर्कस्टेशन्सची घोषणा केली. हायब्रिड कामासाठी पॉली मिशन ४०० सिरीज हेडसेट आणि पॉली जी६२ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्यूशनही सादर करण्यात आले. प्रिंटिंग क्षेत्रात कंपनीने एआय ऑप्टिमाइझ प्रिंट फॉरमॅटिंग फीचर आणले असून त्यामुळे प्रिंटिंग अधिक स्मार्ट, अचूक आणि सुलभ होणार आहे.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, HP OmniPad 12 जून २०२६ पासून ₹४८,९९९ पासून उपलब्ध होईल. तर HP EliteBoard G1a ची सुरुवातीची किंमत ₹१,३५,७१४ ठेवण्यात आली आहे. विविध EliteBook, OmniBook आणि ProBook सिरीज ₹१.२४ लाखांपासून ₹२.५ लाखांपर्यंत उपलब्ध असतील. कंपनीनुसार, ही नवीन उपकरणे विद्यार्थी, व्यावसायिक, क्रिएटर्स आणि उद्योगांच्या बदलत्या गरजांसाठी डिझाइन करण्यात आली आहेत.