Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei चा नवा मास्टरस्ट्रोक! जगातील पहिला नॉन-फोल्डेबल वाईड स्क्रीन फोन लाँच… प्रतिस्पर्ध्यांची वाढली चिंता

Huawei OSTA O1 Pro Launched: हुवावेने पुन्हा एकदा एका नव्या स्मार्टफोनसह धमाका केला आहे. कंपनीने जगातील पहिला नॉन फोल्डेबल वाईड स्क्रीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2026 | 09:09 AM
Huawei चा नवा मास्टरस्ट्रोक! जगातील पहिला नॉन-फोल्डेबल वाईड स्क्रीन फोन लाँच... प्रतिस्पर्ध्यांची वाढली चिंता

Huawei चा नवा मास्टरस्ट्रोक! जगातील पहिला नॉन-फोल्डेबल वाईड स्क्रीन फोन लाँच... प्रतिस्पर्ध्यांची वाढली चिंता

Follow Us
Follow Us:
  • हुवावे ने पुन्हा दाखवली ताकद
  • जगातील पहिला नॉन फोल्डेबल वाईड स्क्रीन स्मार्टफोन लाँच
  • नवीन स्मार्टफोन स्टारी ब्लॅक, नेब्युला व्हाइट आणि स्टारबर्स्ट पर्पल रंगांच्या पर्यायांत लाँच
Huawei Smartphone Launched: स्मार्टफोनच्या दुनियेत धमाका करण्यासाठी हुवावे पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. कंपनीने जगातील पहिला नॉन फोल्डेबल वाईड स्क्रीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Huawei OSTA O1 Pro या नावाने लाँच करण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर चीनमध्ये सुरु झाली आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशिओ 16:9.5 आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनने आता प्रतिस्पर्ध्यांची चिंता नक्कीच वाढली आहे. हुवावे ओएसटीए ओ1 प्रो चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि त्याची किंमत जाणून घेऊया.

GTA 6 पासून प्रेरित… Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु

हुवावे ओएसटीए ओ1 प्रो ची किंमत

कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 5,499 युआन म्हणजेच सुमारे 76,500 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 6,499 युआन म्हणजेच सुमारे 90,330 रुपये, 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 7,299 युआन म्हणजेच सुमारे 1,01,458 रुपये आणि टॉप 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत 8,799 युआन म्हणजेच सुमारे 1,22,309 रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या कंपनी या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंट्सवर 200 युआन म्हणजेच सुमारे 2780 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य: X) 

हुवावे ओएसटीए ओ1 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.39-इंच 1.5K LTPS फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनचा आस्पेक्ट रेशिओ 16:9.5 आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन स्टारी ब्लॅक, नेब्युला व्हाइट आणि स्टारबर्स्ट पर्पल रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये हॉरिजन्टल डुअल कॅमेरा मॉड्यूल आणि मागील बाजूला OSTA चा लोगो देण्यात आला आहे.

हुवावे ओएसटीए ओ1 प्रो स्मार्टफोन Kirin 9030S चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB, आणि 16GB+1TB हे व्हेरिअंट्स उपलब्ध आहेत. हुवावे स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 200-मेगापिक्सेल 1/1.28-इंच RYYB प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत साथ 50-मेगापिक्सेल 3.7x RYYB पेरिस्कोप टेलीफोटो आणि Red Maple लेंस देण्यात आले आहे. या फोनमध्ये 66W वायर्ड चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय… यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट

हुवावे स्मार्टफोन HarmonyOS 7 AI Pioneer Edition वर आधारित आहे. हुवावे या फोनला “HarmonyOS AI फोन” असे संबोधते, ज्यामध्ये सिस्टिम स्तरावर AI वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘Kirin 9030S’ प्रोसेसर असलेला हा स्मार्टफोन अशा प्रकारे डिझाईन केला गेला आहे की, त्याचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, चिप आणि क्लाउड घटक यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Huawei OSTA O1 Pro स्मार्टफोन कधी लाँच झाला?

    Ans: Huawei ने OSTA O1 Pro हा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला असून, त्याची प्री-ऑर्डर सुरू झाली आहे.

  • Que: Huawei OSTA O1 Pro ची किंमत किती आहे?

    Ans: या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 5,499 युआन म्हणजेच अंदाजे 76,500 रुपये आहे. टॉप व्हेरिअंटची किंमत 8,799 युआन म्हणजेच सुमारे 1,22,309 रुपये आहे.

  • Que: Huawei OSTA O1 Pro मध्ये किती मोठा डिस्प्ले आहे?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचांचा 1.5K LTPS फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेशिओ 16:9.5 आहे.

Web Title: Huawei launched worlds first non foldable wide screen phone here are features price and other details hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Huawei
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

GTA 6 पासून प्रेरित… Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु
1

GTA 6 पासून प्रेरित… Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु

How to Use an Old Smartphone: कपाटात पडलेल्या जुन्या मोबाईलचा करा स्मार्ट वापर! 3 भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क
2

How to Use an Old Smartphone: कपाटात पडलेल्या जुन्या मोबाईलचा करा स्मार्ट वापर! 3 भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स… जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स
3

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स… जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर…. Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल
4

दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर…. Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.