
GTA 6 पासून प्रेरित... Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु
काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय… यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट
Caviar द्वारे लाँच करण्यात आलेल्या या खास कलेक्शनमधील सर्वात महागडे मॉडेल आयफोन डुओ Pink Alligator आहे. हा एक कस्टमाइज्ड आयफोन डुओ आहे. या डिव्हाईसची किंमत 13,130 डॉलर म्हणजेच सुमारे 11.7 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये पिंक क्रोकोडाइल लेदर फिनिशसह एयरोस्पेस-ग्रेड टाइटेनियम फ्रेम देखील पाहायला मिळणार आहे. फोनच्या मागील बाजूला 6 चांदण्या आसलेला एक लोगो देखील पाहायला मिळत आहे, जो GTA गेमच्या वॉन्टेड लेवल सिस्टिमने प्रेरित आहे.
अँड्रॉईड यूजर्ससाठी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा Ocean Drive एडिशन सादर करण्यात आले आहे. याची किंमत 11,560 डॉलर म्हणजेच सुमारे 10.3 लाख रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. या स्मार्टफोनच्या टाइटेनियम बॉडीवर 24 कॅरेट गोल्ड प्लेटिंग पाहायला मिळत आहे. या डिव्हाईसच्या डिझाईनमध्ये ज्योमेट्रिक पॅटर्नचा वापर करण्यात आला आहे, जे Miami च्या साऊथ बीच क्षेत्राच्या आर्ट डेको आर्किटेक्चरने प्रेरित आहे.
Caviar ने आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्ससाठी निऑन व्हाइस आणि गँगस्टर एडीशन लाँच केले आहे. प्रो मॉडेलची किंमत 11,130 डॉलर म्हणजेच सुमारे 9.9 लाख रुपये आणि प्रो मॅक्स मॉडेलची किंमत 11,700 डॉलर म्हणजेच सुमारे 10.4 लाख रुपये आहे. दोन्ही मॉडेलच्या मागील बाजूला दोन्ही मॉडेल्सच्या मागील बाजूस ‘बेरेटा 92एफएस’ (Beretta 92FS) पिस्तूलची धातूची शिल्पकृती पाहायला मिळते. निऑन व्हाइसमध्ये मेजेंटा आणि टर्कॉइज एनामेल फिनिश मिळणार आहे तर गँगस्टर मॉडेलमध्ये 24K गोल्ड प्लेटिंग आणि पाम लीफची कर्विंग मिळणार आहे. मात्र, फोनच्या मागील बाजूस असलेल्या धातूच्या डिझाइनमुळे, वायरलेस चार्जिंग आणि मॅगसेफ ॲक्सेसरीज नेहमीप्रमाणे काम करत नाहीत.
कंपनीने केवळ स्मार्टफोनचं नाही तर रे-बॅन वेफेअरर जेन 2 स्मार्ट ग्लास देखील सनसेट आणि गोल्ड रश एडीशनमध्ये लाँच केले आहेत. यामध्ये खास फ्रेम आणि गोल्ड डिटेलिंग पाहायला मिळणार आहे. कॅमेरा, ब्लूटूथ ऑडिओसारख्या इंटरनल फीचर्समध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Ans: Caviar ने GTA 6 गेमपासून प्रेरित होऊन 'Most Wanted' नावाचे खास लग्झरी कस्टमाइज्ड डिव्हाईस कलेक्शन लाँच केले आहे.
Ans: या कलेक्शनमध्ये आयफोन 18 प्रो, फोल्डेबल आयफोन डुओ, सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा आणि रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश आहे.
Ans: आयफोन डुओ Pink Alligator हे या कलेक्शनमधील सर्वात महागडे डिव्हाईस असून त्याची किंमत 13,130 डॉलर म्हणजेच सुमारे 11.7 लाख रुपये आहे.