Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनानिमित्त या प्लॅटफॉर्म्सनी सुरु केलाय Sale, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मिळणार खरेदीची संधी
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर स्वतंत्र्यदिनानिमत्त नवा सेल सुरु करण्यात आला आहे. स्वतंत्र्यदिनानिमत्त फ्लिपकार्टवर इंडिपेंडन्स डे सेल 2025 सुरु करण्यात आला आहे. हा सेल वेबसाईटवर आज13 ऑगस्टपासून लाईव्ह झाला असून 17 ऑगस्टपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या सेलमधून खरेदी करायची असेल तर घाई करावी लागणार आहे. कारण सेल संपण्यासाठी केवळ 4 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
ग्राहक या फ्लिपकार्ट इंडिपेंडन्स डे सेल 2025 मधून ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अनेक वस्तूंची खरेदी करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टचा हा सेल एक बेस्ट ऑप्शन आहे. कंपनीने या सेलचा टिझर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केला आहे. टीझर इमेजमध्ये सॅमसंग, मोटोरोला, व्हिवो, आसुस, एचपी, टीसीएल सारख्या ब्रँड्सवर मोठी सवलत उपलब्ध आहे. फ्लिपकार्टचे ग्राहक विविध ब्रँड्सकडून फोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि यासारखे विविध इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्ट इंडिपेंडन्स डे सेल 2025 बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सुरू झाला आहे आणि सोमवार, 17 ऑगस्ट रोजी संपेल. पाच दिवसांच्या सेल इव्हेंट दरम्यान, कंपनी कॅनरा बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांना 10 टक्के सूट देईल, तसेच बँक ऑफर व्यतिरिक्त कॅशबॅक ऑफर आणि एक्सचेंज बोनस देखील देईल. सेल इव्हेंटच्या नावाबाबत काही गोंधळ असल्याचे दिसून येते. लँडिंग पेज आणि त्याच्या URL वर फ्लिपकार्ट इंडिपेंडन्स डे सेल 2025 असे म्हटले आहे, परंतु त्याच्या बॅनरवर सेल इव्हेंटला फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2025 असे लिहिले आहे.
केवळ फ्लिपकार्टवरच नाही तर क्रोमा आणि विजय सेल्समध्ये देखील स्वतंत्रदिनानिमित्त सेल सुरु झाला आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या रिटेल चेन क्रोमाने देखील स्वतंत्रदिनानिमित्त सेलची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना इथे देखील ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. क्रोमाचा हा सेल सुरु झाला असून सेल 17 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. क्रोमाच्या या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनपासून ते टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनपर्यंत विविध उत्पादने समाविष्ट आहेत. क्रोमाचा स्वातंत्र्य दिन सेल त्यांच्या 560 हून अधिक स्टोअरमध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे विविध शहरातील ग्राहक या ऑफर्सचा लाभ घेऊ शकणार आहेत.
आघाडीच्या ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेनपैकी एक असलेल्या विजय सेल्सने देखील स्वतंत्रदिनानिमित्त सेलची घोषणा केली आहे. ग्राहक स्टोअरला भेट देऊन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने या सेलचा फायदा घेऊ शकतात. हा सेल 140 हून अधिक आउटलेट्सवर आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झाला आहे. सेलची अंतिम तारीख 17 ऑगस्ट आहे. विजय सेल्सच्या या सेलमध्ये ग्राहक प्रीमियम गॅझेट्स, होम अप्लायन्सेस, वेअरेबल आणि एंटरटेनमेंट डिव्हाइसेस अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकतता. ज्या खरेदीदारांनी MyVS लॉयल्टी प्रोग्राममध्ये नोंदणी केली आहे त्यांना 0.75 टक्के पॉइंट्स परत मिळू शकतात (प्रति पॉइंट रु 1), जे स्टोअरमध्ये तसेच ऑनलाइन स्टोअरमध्ये रिडीम करता येतात.