Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Conflict: तुम्ही X वर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंहला फॉलो करताय का? थांबा, वाचा काय आहे सत्य?

Fake Social Media: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक अकाऊंट तयार करणं, काही नवीन नाही. मात्र जेव्हा हे अकाऊंट भारतातील प्रमुख व्यक्तींचे असतील तेव्हा मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. असाच एक प्रकार सध्या उघडकीस आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2025 | 12:08 PM
India-Pakistan Conflict: तुम्ही X वर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंहला फॉलो करताय का? थांबा, वाचा काय आहे सत्य?

India-Pakistan Conflict: तुम्ही X वर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंहला फॉलो करताय का? थांबा, वाचा काय आहे सत्य?

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक भारतीय व्यक्तिला कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यावर गर्व आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान आॉपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविण्यामागे सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांचा हात आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांबाबत सतत पोस्ट केल्या जात आहेत. त्यांच्या यशाच्या गाथा सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. मात्र आता सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे.

India Pakistan War: सावधान! तुमच्या Instagram आणि Facebook फीडवर होऊ शकतो पाकिस्तानी अटॅक, सरकारने जारी केली वॉर्निंग

सोशल मीडियावर व्हायरल होतायत फेक अकाऊंट?

सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांच्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. या अकाऊंटला हजारो लोकांनी फॉलो देखील केलं आहे. मात्र हे अकाऊंट फेक असल्याचं सत्य PIB फॅक्ट चेकने उघड केलं आहे. विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या नावाने एक्सवर फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. हे अकाऊंट ‘@WingVyomikStan’ या नावाने तयार करण्यात आलं असून याचे 28,000 फॉलोअर्स देखील आहेत. याशिवाय कर्नल सोफिया कुरेशी यांच्या नावाने देखील फेक एक्स अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. हे अकाऊंट @SofiyaQuresi या नावाने तयार करण्यात आलं असून याचे 68,000 फॉलोअर्स आहेत. हे दोन्ही एक्स अकाऊंट फेक असल्याचं फॅक्ट चेकने सांगितलं आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

पोस्टमध्ये काय सांगितलं आहे?

सरकारद्वारे हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांचे कोणतेही एक्स अकऊंट नाही. हे दोन्ही अकाऊंट फेक आहेत. नागरिकांनी सतर्क रहा. अधिकृत माहितीसाठी फक्त अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवा. ऑपरेशन सिंदूरवरील मीडिया ब्रीफिंगमध्ये सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी त्यांच्या भूमिकेमुळे लोकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक फेक अकाऊंट तयार केले जात आहेत.

सरकारने नागरिकांना केलं हे आवाहन

भारतीय हवाई दलाच्या पायलट विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी देशातील काही सर्वात आव्हानात्मक भागात हेलिकॉप्टर उडवले आहेत. सरकारने लोकांना कंटेंट शेअर करण्यापूर्वी तथ्ये पडताळण्याचे आवाहन केले आहे आणि सशस्त्र दलांशी संबंधित अपडेट्ससाठी फक्त अधिकृत संरक्षण आणि पीआयबी चॅनेलवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरणार नाहीत.

#Fake Account Alert🚨 Are Wg. Cdr. Vyomika Singh & Col. Sofiya Qureshi on X❓#PIBFactCheck ❌ NO! Both these handles are #fake ✅There is NO official X handle of Wg. Cdr. Vyomika Singh & Col. Sofiya Qureshi 🔎Stay vigilant. Rely only on official sources for authentic… pic.twitter.com/ThJbOgrxfs — PIB Fact Check (@PIBFactCheck) May 10, 2025

कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?

7 मे रोजी, ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी यांनी पहिल्यांदाच माध्यमांना संबोधित केले. सोफिया कुरेशी या बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर आहे. त्यांचे आजोबाही भारतीय सैन्यात सेवा बजावत होते.

Mother’s Day 2025: मातृदिनानिमित्त BSNL ने दिलं खास गिफ्ट, कमी केली या 3 प्लॅन्सची किंमत

कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंग?

विंग कमांडर व्योमिका सिंग, एक आयएएफ पायलट आहे आणि त्या भारतातील सर्वात आव्हानात्मक भूप्रदेशांसह उच्च-जोखीम असलेल्या झोनमध्ये हेलिकॉप्टर उडवण्याच्या त्यांचया कौशल्यासाठी ओळखल्या जातात.

Web Title: India pakistan conflict fake accounts of colonel sofiya qureshi and wing commander vyomika singh are getting viral on x tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.