Mother’s Day 2025: मातृदिनानिमित्त BSNL ने दिलं खास गिफ्ट, कमी केली या 3 प्लॅन्सची किंमत
11 मे रोजी भारतात मदर्स डे साजरा केला जाणार आहे. मदर्स डेनिमित्त प्रत्येकजण त्याच्या आईला काही ना काही खास गिफ्ट देण्याची तयारी करत असतो. यंदाच्या मदर्स डेनिमित्त भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सुरु केली आहे. ग्राहकांना गिफ्ट देण्यासाठी कंपनीने त्यांच्या तीन रिचार्ज प्लॅन्सची किंमत कमी केली आहे. हे कंपनीच्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सपैकी एक आहेत. कंपनीने या रिचार्ज प्लॅन्सवर 5 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑफर 7 ते 14 मे पर्यंत सुरु राहणार आहे. मदर्स डे च्या खास दिनानिमित्त ही ऑफर सुरु करण्यात आली आहे.
कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर या ऑफरबाबत माहिती दिली आहे आणि एक पोस्ट शेअर केली आहे. BSNL च्या वेबसाइट किंवा BSNL Selfcare App वरून रिचार्ज केल्यानंतर युजर्सना हे डिस्काऊंट दिलं जाणार आहे. कंपनीने सुरु केलेली ही ऑफर 2399 रुपये, 997 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्सवर दिली जात आहे. ज्यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL चा हा प्लॅन सर्वात लोकप्रिय लॉन्ग-टर्म प्लॅन्सपैकी एक आहे, जो सध्या सुरु असणाऱ्या ऑफर अंतर्गत केवळ 2279 रुपयांना उपलब्ध आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 395 दिवसांची आहे म्हणजेच या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB हाई-स्पीड डेटा, भारतात कुठेही अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100 SMS ऑफर केले जातात. या प्लॅनची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये BiTV ची फ्री सर्विस ऑफर केली जाते.
हा प्लॅन अशा लोकांसाठी बेस्ट आहे, जे कमी कालावधीसाठी रिचार्ज प्लॅन खरेदी करतात. या प्लॅनमध्ये 160 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये युजर्सना 2GB प्रतिदिन डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 100 SMS डेली ऑफर केले जातात. सध्या सुरु असणाऱ्या या रिचार्ज अंतर्गत 997 रुपयांचा हा प्लन केवळ 947 रुपयांना उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे ग्राहकांची 50 रुपयांची बचत होणार आहे. यामध्ये देखील युजर्सना BiTV का मोफत अॅक्सेस दिला जाणार आहे.
Mother’s Day 2025: मातृदिनानिमित्त आपल्या आईला गिफ्ट करा हे Useful Gadgets, मदर्स डे होईल खास
तुम्ही कधी व्हॅलिडिटी असणाऱ्या प्लॅनच्या शोधात असाल तर 599 रुपयांचा प्लॅन एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. यामध्ये युजर्सना 3GB प्रतिदिन डेटा, भारतात कुठेही अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन दिले जातात. ऑफर अंतर्गत हा प्लॅन 569 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.