India Pakistan War: सावधान! तुमच्या Instagram आणि Facebook फीडवर होऊ शकतो पाकिस्तानी अटॅक, सरकारने जारी केली वॉर्निंग
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. दोन्ही देशांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु होत आहेत. पाकिस्तानच्या भारतावरील सर्व हल्ल्यांना भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान जम्मू – काश्मिर आणि पंजाब, या ठिकाणांवर सतत हल्ले करत आहे. मात्र त्यांचे हे हल्ले परतवून लावण्यात भारतीय सैन्य यशस्वी होत आहे. मात्र पाकिस्तान केवळ जमिनीवरच नाही तर सोशल मीडियावर देखील अटॅक करत आहे. पाकिस्तान भारतातील सोशल मीडिया युजर्सना टार्गेट करत आहे.
भारतातील सोशल मीडिया युजर्सच्या फीडमध्ये खोटे व्हिडीओ पाहायला मिळात आहेत हे व्हिडीओ सध्याच्या सुरु असलेल्या घडामोडींवर आधारित आहेत. भारतातील सोशल मीडिया युजर्सच्या फीडमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धासंबंधित आणि भारतीय सैन्यासंबंधित अनेक फेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याला इंस्टाग्राम आणि फेसबूक फीडवरील पाकिस्तान अटॅक असं नाव देण्यात आलं आहे. यासंबंधित भारत सरकारच्या फॅक्ट चेक टिमने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारत सरकारच्या फॅक्ट चेकिंग एजेंसी PIB फॅक्ट चेकने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सोशल मीडिया युजर्सना घाबरवण्यासाठी आणि “पाकिस्तानी प्रोपेगेंडा” ला प्रोत्साहन देण्यासाठी व्हायरल केल्या जाणाऱ्या व्हिडीओंबाबत चेतावणी देण्यात आली आहे.
🚨 YOUR SOCIAL MEDIA FEEDS ARE UNDER ATTACK🚨
Beware of suspicious videos related to #IndianArmedForces or the ongoing situation. These are key tools of malicious manipulation.
🛑 Don’t fall for it. Don’t spread it.
🔍 Suspect something?
📤 Report to #PIBFactCheck
📱 WhatsApp:… pic.twitter.com/mtsrGRUbic— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 10, 2025
पोस्टमध्ये युजर्सना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी भारतीय सशस्त्र दलांशी किंवा भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित संशयास्पद व्हिडिओंना बळी पडू नका. सावध रहा आणि सतर्क रहा. पोस्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, तुमच्या सोशल मीडिया फीड्सवर हल्ला होत आहे. इंडियन आर्मीडफोर्सेस किंवा सध्याच्या परिस्थितीशी संबंधित संशयास्पद व्हिडिओंपासून सावध रहा. त्याच्या जाळ्यात अडकू नका. असे व्हिडीओ शेअर करून नका. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते.
पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर लिहीलं आहे की, चेतावणी! तुमच्या सोशल मीडिया फीडमध्ये बनावट व्हिडिओ दिसणे हा अपघात नाही. हे पाकिस्तानच्या प्रचार नेटवर्ककडून केले जात आहे. दिशाभूल करणारा मजकूर फॉरवर्ड केल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. सतर्क रहा आणि असे व्हिडीओ शेअर करू नका.
सध्याच्या या सुरु असलेल्या परिस्थितीत आणखी एक दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा दावा म्हणजे तुमच्या स्मार्टफोनचं लोकेशन बंद ठेवा. पाकिस्तानातून लोकेशन ट्रेस केलं जात आहे. असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचं फॅक्ट चेकने सांगितलं आहे. यासंबंधित त्यांनी एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.
A viral image is claiming that an advisory has been issued, advising people to turn off location services on their phones immediately.#PIBFactCheck
– This claim is FAKE
– No such advisory has been issued by the GoI pic.twitter.com/8GmYpKXTkJ
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2025