भारत सरकारचा मोठा निर्णय, 1 करोड WhatsApp अकाउंट्स केले बॅन; काय आहे कारण? तुम्ही करू नका ही चूक
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या मााध्यमातून होणारे घोटाळे आणि स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्कॅमर्स सोशल मीडियावर लोकांना खोटे मॅसेज पाठवतात आणि खोट्या जाहिराती शेअर करतात. यावर अनेक लोकं विश्वास ठेवतात आणि नंतर त्यांची फसवणूक होते. मात्र आता या सर्व घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील घोटाळे आणि फसव्या कारवाया रोखण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवरील सुमारे 1 करोड अकाऊंट बॅन करण्यात आली आहेत.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अहवालात, मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने 1 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान भारतात 99 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. अहवालात असे म्हटले आहे की सर्व बंदी घातलेल्या खात्यांपैकी 13.27 लाख अकाऊंट्सवर अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच सक्रियपणे बंदी घालण्यात आली होती. सरकारने हा निर्णय का घेतला याबाबत अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आता या निर्णयामागचं कारण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रोएक्टिव बंदी व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपला त्यांच्या अधिकृत तक्रार चॅनेलद्वारे भारतातील युजर्सकडून 9,474 तक्रारी प्राप्त झाल्या. तथापि, या तक्रारींच्या आधारे केवळ 239 अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली. बॅन अपील्सचा सर्वाधिक वाटा (4,212) होता, ज्यापैकी 111 अकाउंट्स रिव्यूनंतर रिस्टोअर करण्यात आली.
अहवालानुसार, माहिती तंत्रज्ञान (इंटरमीडियरी गाइडलाइंस एंड डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 च्या नियम (1)(d) आणि नियम 3A(7) अंतर्गत काही धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल व्हॉट्सअॅपने या अकाउंट्सवर बंदी घातली आहे. WhatsApp त्यांच्या सेवा अटींचे उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सना शोधण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्वयंचलित प्रणाली आणि वापरकर्ता अभिप्राय वापरते. स्पॅम, चुकीची माहिती, फसव्या अॅक्टिव्हीटी आणि गैरवापर यासारख्या कारणांसाठी हे प्लॅटफॉर्म अकाउंट्सवर बंदी घालते.
अवांछित किंवा मोठ्या प्रमाणात संदेश पाठविणे: ऑटोमेटेड किंवा मोठ्या प्रमाणात संदेश पाठविणे प्रतिबंधित आहे आणि त्यामुळे तात्काळ निलंबन होऊ शकते.
अनऑथोराइज्ड कॉन्टॅक्ट लिस्ट शेयर करणं: संमतीशिवाय लोकांना ग्रुपमध्ये जोडणे किंवा अनधिकृत स्त्रोतांकडून डेटा वापरणे यामुळे WhatsApp धोरणांचे उल्लंघन आहे.
ब्रॉडकास्ट लिस्टचा अतिवापर: वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज पाठवल्याने तुमचं अकाऊंट बॅन केलं जाण्याची शक्यता आहे.
WhatsApp च्या सेवा अटींचे उल्लंघन करणे: चुकीची माहिती पसरवणे, द्वेषपूर्ण भाषण देणे किंवा बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये सहभागी होणे यामुळे अकाऊंट बॅन होऊ शकते.