Chatgpt vs Copilot vs Grok: कसा होता सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास, कोणत्या AI ने काय म्हटलं? उत्तर वाचून तुम्हीही व्हाल थक्क
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. 18 मार्च रोजी दोन्ही अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले. त्यांच्या या प्रवासानंतर सध्या सुनीता विल्यम्स यांचा हा 9 महिन्यांचा अंतराळातील अनुभव, या प्रवासावर त्यांची प्रतिक्रिया, त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी करण्यात आलेल्या स्पेसशिपचा वापर, या सर्वच विषयांची चर्चा सुरु आहे. सुनीता विल्यम्स यांच्या या 9 महिन्यांच्या अंतराळप्रवासाबाबत माहिती देण्यासाठी AI देखील उत्सुक आहे. आता आपण सुनीता विल्यम्सच्या अंतराळप्रवासाबाबत Chatgpt, Copilot आणि Grok ने दिलेली माहिती वाचूया. (फोटो सौजन्य – Pinterest)
एलॉन मस्कच्या Grok AI ने सुनीता विल्यम्स यांचा अलीकडील अंतराळ अनुभव सांगितला आहे. Grok AI ने दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, सुनीता विल्यम्स, भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर, यांनी नुकतेच त्यांचे तिसरे अंतराळ मिशन पूर्ण केले. त्यांचा हा प्रवास 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर अंतराळयानातून सुरू झाला होता. सुरुवातीला हे मिशन फक्त आठ दिवसांचे असणार होते, परंतु स्टारलाइनरला हेलियम गळती आणि प्रोपल्शन सिस्टम समस्यांमुळे हा प्रवास नऊ महिन्यांहून अधिक काळ सुरु राहिला. या काळात सुनीता आणि त्यांचे सहकारी बर्च विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकले होते.
या मिशनदरम्यान, सुनीता यांनी एक्स्पिडिशन 71/72 च्या सदस्य म्हणून काम केले. त्यांनी अंतराळात 286 दिवस घालवले आणि दोन स्पेसवॉक केल्या, ज्यामुळे त्यांचा एकूण स्पेसवॉकचा वेळ 62 तास आणि 6 मिनिटांवर पोहोचला. सुनीता आणि बर्च यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी NASA ने SpaceX च्या ड्रॅगन अंतराळयानाचा वापर केला. सुनीता आणि बर्च यांच्यासोबत निक हेग आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्सांद्र गोर्बुनोव्ह Crew-9 मिशन अंतर्गत 18 मार्च 2025 रोजी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले.
ओपनएआयच्या Chatgpt ने सुनीता विल्यम्स यांच्या प्रवासाबाबत काय सांगितलं जाणून घेऊया. Chatgpt ने दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, जून 2024 मध्ये, सुनीता विल्यम्स त्यांचे सहकारी बॅरी विलमोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर आठ दिवसांच्या मोहिमेसाठी पाठवण्यात आले. पण, बोइंगच्या स्टारलाइनर यानाच्या सेवा मॉड्यूलमधील तांत्रिक अडचणींमुळे, त्यांचे ISS वरील वास्तव्य नऊ महिन्यांपर्यंत वाढले. या नऊ महिन्यांच्या कालावधीत, सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग, अंतराळ चालणे (स्पेसवॉक) आणि ISS च्या देखभालीचे महत्त्वपूर्ण काम केले. मार्च 19, 2025 रोजी, स्पेसएक्सच्या क्रू-9 ड्रॅगन अंतराळयानाद्वारे त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यात आले.
सुनीता विल्यम्स यांच्या प्रवासाबाबत मायक्रोसॉफ्टच्या Copilot ने दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, सुनीता विल्यम्स यांनी नुकत्याच संपलेल्या अंतराळ प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्या 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर यानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचल्या होत्या. हा प्रवास फक्त 8 दिवसांचा असणार होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकावर थांबावे लागले.
Vivo ने लाँच केला V50 चं Lite वर्जन, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 6,500mAh बॅटरीने सुसज्ज! वाचा किंमत
या काळात त्यांनी 150 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले, ज्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा द्रव पदार्थांवर होणारा परिणाम, नवीन रिऍक्टरचा विकास, आणि अंतराळात पोषणतत्त्व तयार करण्याच्या बायोन्यूट्रिएंट प्रकल्पावर काम केले. त्यांनी 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक करत विक्रम प्रस्थापित केला आणि अंतराळ स्थानकाची देखभाल व स्वच्छता केली. स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाद्वारे त्या 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुखरूप परतल्या. त्यांचा हा प्रवास वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.