Jio-Airtel-Vi-BSNL युजर्सवर सरकार घेणार ॲक्शन! 1.7 करोड सिम कार्ड बंद, काय आहे कारण?
सरकारने Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL सिम कार्ड वापरणाऱ्यांवर आता मोठी कारवाई केली आहे. सरकारने या सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सचे सुमारे 1.7 कोटी सिमकार्ड ब्लॉक केले आहेत. हे सिमकार्ड बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या माध्यमातून देण्यात आले होते. बनावट कागदपत्रे देऊन जी सिमकार्ड दिली जात होती ती सरकार बंद करत आहे.
अशा परिस्थितीत तुमचे सिमकार्ड दुसऱ्याच्या कागदपत्रावर दिले जाऊ नये हे तुम्हाला कळले पाहिजे. असे झाल्यास तुमचे सिम कार्ड देखील ब्लॉक होऊ शकते. सरकार अशा बनावट सिम कार्डांवर सातत्याने बंदी घालत आहे जेणेकरून स्पॅम कॉल्स थांबवता येतील.
हेदेखील वाचा – Samsung Galaxy A16 5G: 6 वर्ष चालणार, वारंवार फोन बदलण्याची झंझट संपणार
बनावटी कागदपत्रांसह खरेदी केलेले 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूलच्या मदतीने सरकारद्वारे ब्लॉक करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, दूरसंचार विभाग (DOT) सह कार्यरत चार दूरसंचार सेवा ऑपरेटर (TSPs) यांनी 45 लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स दूरसंचार नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून रोखले आहे.
संचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, बँका आणि पेमेंट वॉलेटद्वारे सुमारे 11 लाख अकाउंट्स फ्रीझ केली आहेत. येत्या काही दिवसांत आणखीन सिमकार्ड ब्लॉक केले जातील, असे सरकारचे म्हणणे आहे.
हेदेखील वाचा – या व्यक्तीने चक्क 90 हजार रुपयांचा iPhone 16 फक्त 27 हजार रुपयांना विकत घेतला, कसे ते जाणून घ्या