अलीकडेच, दिग्गज टेक कंपनी ॲपलने iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. भारतात iPhone 16 ची किंमत सध्या 79,900 रुपये आहे, तर iPhone 16 च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे. दरम्यान, एका व्यक्तीने आयफोनचे हे मॉडेल अवघ्या 27 हजार रुपयांना विकत घेतले आहे. अलीकडेच एका व्यक्तीने इंटरनेटवर याचा खुलासा केला, ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. व्यक्तीने एक युक्ती वापरत iPhone 16 स्वस्तात कसा विकत घेतला हे सांगितले. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर आता लोकही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
त्या व्यक्तीने Reddit वरील पोस्टमध्ये सांगितले की, त्याने क्रेडिट कार्डद्वारे 89 हजार रुपये किमतीचा iPhone 16 खरेदी केला आहे. त्या व्यक्तीने रिवॉर्ड पॉइंट्स वापरून हा फोन खरेदी केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आजकाल अनेक बँका प्रत्येक खरेदीवर काही रिवॉर्ड पॉइंट देतात, ज्याचा वापर करून तुम्ही ते डिस्काउंट कूपनमध्ये किंवा रोख स्वरूपातही रिडीम करू शकता. आयफोन 16 खरेदी करताना त्या व्यक्तीने 62 हजाराहून अधिक रिवॉर्ड पॉइंट्स वापरले, त्यानंतर या फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली.
हेदेखील वाचा – जिओने घेतला 5G नेटवर्कवर यू-टर्न, एअरटेलपप्रमाणे मारली पलटी, जाणून घ्या का परतले 4G’वर?
आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक क्रेडिट कार्ड प्रत्येक पेमेंटसाठी त्यांच्या युजर्सना काही रिवॉर्ड पॉइंट देतात. हे पॉइंट बचतीसाठी सवलत म्हणून वापरले जाऊ शकतात. याचा अर्थ युजर्सने मागील खर्चातून मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करून मोठ्या सवलतीसह iPhone 16 खरेदी केला आहे.
हेदेखील वाचा – AI मुळे पडणार पैशांचा पाऊस! भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याची शक्यता
आणखीन एका यूजरने Reddit पोस्टवर लिहिले की 62,930 रिवॉर्ड पॉइंट्स गोळा करण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील. याच्या उत्तरात आयफोन 16 खरेदी करणाऱ्या युजरने लिहिले, ’15 लाख रुपये.’ म्हणजे, आयफोन 16 खरेदी करण्यासाठी, व्यक्तीने क्रेडिट कार्डद्वारे 15 लाख रुपये खर्च केले होते, त्यानंतर तो सवलतीत आयफोन 16 खरेदी करू शकतो.