Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच येणार स्वदेशी वेब ब्राउझर! भारतीय युजर्सचा डेटा राहणार अधिक सुरक्षित, डिजिटल सेफ्टी आणि प्रायव्हसीही होणार मजबूत

भारतात लवकरच स्वदेशी सुरक्षित वेब ब्राउझर विकसित केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा वेब ब्राऊझर अतिशय सुरक्षित असणार आहे. या आगामी स्वदेशी सुरक्षित वेब ब्राउझरबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2025 | 10:08 AM
लवकरच येणार स्वदेशी वेब ब्राउझर! भारतीय युजर्सचा डेटा राहणार अधिक सुरक्षित, डिजिटल सेफ्टी आणि प्रायव्हसीही होणार मजबूत

लवकरच येणार स्वदेशी वेब ब्राउझर! भारतीय युजर्सचा डेटा राहणार अधिक सुरक्षित, डिजिटल सेफ्टी आणि प्रायव्हसीही होणार मजबूत

Follow Us
Close
Follow Us:

डिजीटल इंडियाच्या दिशेने सध्या आपला भारत देश वाटचाल करत आहे. त्यामुळे भारतात अनेक नवीन बदल केले जात आहेत. असाच एक मोठा बदल आता होणार आहे. हा बदल म्हणजे भारतीयांसाठी मोठी प्रगती आहे. कारण आता भारतात स्वदेशी सुरक्षित वेब ब्राउझर विकसित केला जाणार आहे. हा वेब ब्राउझर भारतीयांसाठी विकसित केला जाणार आहे. हा वेब ब्राऊझर सुरक्षित असणार आहे.

Samsung चा स्लिम आणि शक्तिशाली स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लाँच होण्याची शक्यता, ही असू शकते किंमत

डिजिटल स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत असताना आता भारताने स्वदेशी सुरक्षित वेब ब्राउझर विकसित करण्याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MEITY) स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत यासाठी एक विशेष प्रकल्प सुरू केला आहे. हे वेब ब्राउझर युजर्सना सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेट ब्राउझिंग अनुभव देईल. हा प्रकल्प सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) बेंगळुरूने सुरू केला आहे. (फोटो सौजन्य – X)

ही असतील सुरक्षित वेब ब्राउझरची वैशिष्ट्ये

हे भारतीय वेब ब्राउझर iOS, Android आणि Windows सारख्या सर्व प्रमुख प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. त्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

उच्च-स्तरीय डेटा सुरक्षा: हे ब्राउझर भारतातच युजर्सचा डेटा संग्रहित करेल, ज्यामुळे संवेदनशील माहितीवर नियंत्रण राहील. या निर्णयामुळे भारतीयांचा डेटा दुसऱ्या देशात जाणार नाही.

सीसीए इंडिया रूट सर्टिफिकेट आणि डिजिटल साइनिंग: ब्राउझरमध्ये एक समर्पित ट्रस्ट स्टोअर असेल, जे डिजिटल साइनिंग आणि ऑथेंटिकेशनला सपोर्ट करणार आहे.

मुलांसाठी अनुकूल ब्राउझिंग आणि पालक नियंत्रणे: मुलांची सुरक्षितता आणि पालकांच्या चिंता लक्षात घेऊन, त्यात काही विशेष ब्राउझिंग वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

वेब 3 सपोर्ट आणि आधुनिक ब्राउझर क्षमता: हे युजर्सना प्रगत वेब तंत्रज्ञानासह सुरक्षित आणि जलद इंटरनेट अनुभव देईल.

इंडियन वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंज (IWBDC)

स्वदेशी ब्राउझर विकसित करण्यासाठी इंडियन वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंज (IWBDC) कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. देशभरातील स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील नेते यात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम तीन टप्प्यात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये आइडिया, प्रोटोटाइप आणि प्रोडक्टाइजेशन चॅलेंज यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाता 434 हून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. यापैकी 8 संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले आहेत.

AMOLED डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह itel चं नवं स्मार्टवॉच लाँच, हटके फीचर्स आणि किंमत तुमच्या बजेटमध्ये

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या 8 संघांची घोषणा केली आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल संघाचे कौतुकही केले. या दरम्यान, झोहो कॉर्पोरेशनने 1 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आणि टीम पिंग (स्टार्टअप) ला प्रथम उपविजेते म्हणून 75 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आणि टीम अजना ला द्वितीय उपविजेते म्हणून 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याच वेळी, मल्टी-प्लॅटफॉर्म ब्राउझर डिझाइनसाठी जिओ विश्वकर्माला विशेष उल्लेख मिळाला.

भारत डिजिटल स्वावलंबनाकडे

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, स्वदेशी वेब ब्राउझर हे डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी स्टार्टअप्स आणि उद्योगांना भारतीय डिजिटल सोल्यूशन्ससाठी सुरक्षित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रेरित केले.

Web Title: Indian web browser will launch soon now users data will be more safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 10:08 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.